Chandu champion ह्या सिनेम्याला रिलीज होऊन दहा दिवस पूर्ण झाले आहे. सिनेम्याचे दहा दिवसांचे कलेक्शन हाती आले असून सिनेम्याने चांगली कमाई केली आहे. मात्र बजेट नुसार सिनेम्याकडून मेकर्स व डायरेक्टर ह्यांना जशी अपेक्षा होती तस कलेक्शन सिनेम्याने केलं नसून, कलेक्शन च्या बाबतीत सिनेमा थोडा मागे पडला आहे. 14 जून ला चंदू चॅम्पियन ह्या Kartik aryan स्टारर सिनेमा जगभरात तसेच इंडिया मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमा Murlikant pedanekar ह्या रिटायर आर्मी ऑफिसर ह्यांचा बाओपीक असून मुरलीकांत पेडणेकर हे पहिले पॅरालम्पिक पटू आहे कि ज्यांनी भारताला पहिले पॅराऑलम्पिक गोल्ड मेडल मिळवून दिल होते. सिनेम्यात कार्तिक आर्यन मुरलीकांत पेडणेकर ह्या ऍथलिट च्या भूमिकेत असून त्याने पहिल्यांदा चरित्र पट केला आहे. ह्या सिनेम्यासाठी कार्तिक ह्याने खूप मेहनत घेतली असून त्याला ह्या सिनेम्यासाठी एका ऍथलेट प्रमाणे बॉडी बनवावी लागली होती. ह्या सिनेम्यासाठी त्याने तब्बल १५ कोटी एवढं मानधन घेतलं असून त्याने आतापर्यंत त्याच्या करिअर मध्ये सर्वात जास्त मानधन ह्याच सिनेम्यासाठी घेतलं आहे. सिनेम्याला kabir khan ह्या बॉलिवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला असून सिनेम्याला साजिद नाडियावाला ह्यांनी प्रोड्युस केला आहे. सिनेम्याची कथा व स्टार नुसार हा खूप बिग बजेट सिनेमा असून सिनेम्यासाठी 100 कोटी एवढा खर्च आला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून अनेक सेलेब्रिटी व खेळाडूंनी हा सिनेमा बघितल्यानंतर सिनेम्याची प्रशंसा केली आहे. अनेक जणांनी सिनेमा खूप प्रेरणादायी असून भारतातील लाखो तरुणांना ह्यामुळे प्रेरणा मिळते असे अनेकांनी त्यांच्या सोशिअल मीडिया अकॉउंट वर लिहलं आहे. तसेच ह्या सिनेम्यात कार्तिक ह्याच्या अभिनयाची अनेकांनी प्रशंसा केल आहे.

  Chandu champion 10 box office collection

http://www.sacnilk.com  नुसार सिनेमा 14 जून ला प्रदर्शित झाला होता. सिनेम्याने आपल्या ओपनिंग डे च्या दिवशी 4.25 कोटी एवढी  कमाई केली होती. सिनेम्याच्या अपेक्षे प्रमाणे हि ओपनिंग कमी मानली जात आहे. त्यानंतर सिनेम्याच्या कमाई मध्ये दुसऱ्या दिवशी वाढ झाली व सिनेम्याने दुसऱ्या दिवशी 7 कोटी एवढं कलेक्शन केलं होत. परत सिनेम्याच्या तिसऱ्या दिवशी संडे असल्यामुळे सिनेम्याच्या कमाई मध्ये वाढ झाली व सिनेम्याने 9.75 कोटी एवढी कमाई केली होती. म्हणजे सिनेम्याने आपल्या पहिल्या विकेंड च्या शेवटी 21 कोटी एवढी कमाई केली होती. नंतर सिनेम्याच्या कमाई मध्ये कमालीची घट बघायला मिळाली आहे. सिनेम्याने आपल्या चौथ्या दिवशी 5 कोटी एवढं कलेक्शन केलं तर पाचव्या दिवशी सिनेम्याने 3 कोटी एवढं कलेक्शन केलं होत. सिनेम्याने पुढे 6व्या,सातव्या व आठव्या दिवशी सलग 2.75कोटी 2.50 कोटी व 2.50 कोटी एवढं कलेक्शन केलं होत. म्हणजे सिनेम्याच्या 5 व्या दिवसापासूनच ह्या बिग बजेट सिनेम्याचं कलेक्शन 5 कोटी च्या खाली उतरलं होत. मात्र सिनेम्याच्या 9 दिवशी म्हणजे दुसऱ्या विकेंड ला सिनेम्याच्या कलेक्शन मध्ये थोडी वाढ झाली असून सिनेम्याने 9 दिवशी 4.75 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. तर दहाव्या दिवशी संडे असल्यामुळे सिनेम्याच्या कमाई मध्ये अजून वाढ झाली आहे सिनेम्याने आपल्या 10 व्या दिवशी 6.5 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. सिनेम्याने आपल्या पहिल्या पूर्ण वीक मध्ये 35.25 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे तर सिनेम्याने आपल्या पूर्ण दहा दिवसात फक्त भारतात 49. 25 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. सिनेम्याने पूर्ण जगभरात 69 कोटी एवढं कलेक्शन काळ आहे. सिनेमा अजूनही सिनेमागृहात कायम असून सिनेमा लवकरच 100 कोटी एवढा आकडा पूर्ण करेल अशी आशा आहे.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या  वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.