या लेखात

  •   विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज ह्याच्या भूमिकेत.
  •    छावा समोर पुष्पा सारख्या मोठ्या सिनेमांचे क्लॅश थांबवून सिनेम्याची रिलीज डेट ढकलली पुढे.

 

     विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज ह्याच्या भूमिकेत.

Viky kaushal” हा त्याच्या मोठया प्रोजेक्ट मध्ये सध्या व्यस्त आहे. छत्रपती संभाजी महाराज ह्याच्या जीवनावर आधारित असा “Chava” असा सिनेमा विकी कौशल करत आहे. विकी चा मागेच ह्या सिनेम्यातील कॉस्ट्यूम चा लूक मागे चांगलाच वायरल झाला होता. छावा ह्या सिनेम्याला Laxman uttekar डायरेक्ट करणार असून ह्या सिनेम्याला दिनेश व्हिजन प्रोड्युस करत आहे. मोठ्या बँनर खाली हा सिनेमा बनत असून छोटे स्मॉल बजेट प्रोजेक्ट करणारे मॅडोक पहिल्यांदाच हिस्टोरिकल सब्जेक्ट घेऊन येत आहे. छावा हा सिनेमा मराठीतील थोर लेखक शिवाजी सावंत ह्यांच्या छावा ह्या नॉव्हेल वर आधारित असून हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे पुत्र संभाजी महाराज ह्यांचं जीवन चरित्र असणार आहे. शिवाजी महाराज ह्यांच्यावर अनेक सिनेमे येऊन गेले आहे. मात्र संभाजी महाराज ह्यांच्या जीवना बद्दल अनेक संभ्रम किंवा अपूर्ण माहिती लोकांना आहे, पहिल्यांदा संभाजी महाराज ह्यांचं जीवन पट मोठ्या परद्यावर येणार असून त्यांच्या जीवनातील अनेक महत्वाच्या घटना आपल्याला सिनेम्यामध्ये बघायला मिळणार आहे. मराठी सिनेमाने असा प्रयोग आधीच केला आहे. मात्र हिंदी जनता ह्या विषयाला पूर्ण नवीन असणार आहे. ह्या सिनेम्यात संभाजी महाराज ह्यांच्या पत्नी राणी येसूबाई ह्यांची भूमिका Rashmika mandana करत असून ह्या सिनेम्यात अक्षय खन्ना, दिव्या दत्त, डियांना हे हि असणार आहे. सिनेम्याचे डायरेक्शन लक्ष्मण उतेकर करणार असून सिनेमा मॅडोक फिल्म ह्या बँनर खाली बनणार आहे.

“छावा” समोर “पुष्पा” सारख्या मोठ्या सिनेमांचे क्लॅश थांबवून सिनेम्याची रिलीज डेट ढकलली पुढे.

मॅडोक छोटे छोटे मनोरंजक प्रोजेक्ट तयार करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. मॅडोक ने मागच्या काही काळात जरा हटके जरा बचके, ‘तेरी बातो मे ऐसा उलाझा जिया, मिमी, लुका छुपी, स्त्री, स्त्री 2 अश्या अनेक हिट सिनेम्यांनी चांगलच मार्केट गाजवलं आहे. छोट बजेट असलेलं सामान्य लोकांची कथा विशेष पद्धतीने व हलकी फुलकी कॉमेडी करून मांडणे अशी मॅडोक ची आतापर्यंत ची विशेषतः आहे. मोठे मास ऍक्शन सिनेमा किंवा मोठं मोठे टेकनॉलॉजि वापर करून vfx ने भरलेले असे सिनेमे मॅडोक करत नाही. मात्र मोठा हिस्टोरिकल सिनेम्याची जोखीम पहिल्यांदा मॅडोक ने घेतली आहे. छावा हा हिस्टोरिकल सिनेमा असून सिनेम्या मोठ्या लेव्हल वरील ऍक्शन पट असणार आहे. सिनेम्यामध्ये मोठं मोठे युद्धाचे सिन आहे असे मिळालेल्या माहिती वरून समोर आले आहे त्यामुळे नक्कीच ह्या सिनेम्याचं बजेट मोठं असणार असून सिनेम्याला चांगल्या मुहूर्तावर रिलीज करण्याचं टेन्शन मेकर्स ना आल आहे. सिनेम्याची रिलीज डेट बद्दल अजून चांगलाच संभ्रम असून सिनेम्याची रिलीज डेट मुळे सिनेमा लेट होऊ शकतो. आधी छावा हा सिनेमा 6 डिसेंबर ह्या दिवशी रिलीज होणार असं समोर आलं होत मात्र त्या दिवशी पुष्पा 2 रिलीज होणार आहे. पुष्पा ने मोठ्या थाटात ट्रेलर लाँच सोहळा करून मोठ्या लेव्हल वर सिनेम्याचं प्रमोशन सुरु केलं आहे. व पुष्पा 2 ह्या सिनेम्याला एकूणच प्रेक्षकांचा रिस्पॉन्स बघता हा सिनेमा आधीच हाउसफुल राहणार असं कयास लावला जात आहे. त्यामुळे जर पुष्पा 2 ह्या सिनेम्यासमोर कोणता मोठा सिनेमा आला तर त्या सिनेम्याचं नक्कीच नुकसान होऊ शकते. त्यामुळे छावा एखादी सिक्युअर डेट बघून सिनेमा रिलीज करेल हे नक्की आहे. सिनेम्याचं ट्रेलर अजून समोर आलं नसून लवकरच ट्रेलर रिलीज होईल अशी आशा आहे.

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड  http://filmikida.com ला भेट द्या.