“Ashiki 3” ह्या सिनेम्याचं पोस्टर मागे Kartik aryan ने त्याच्या सोसिअल मीडिया अकॉउंट वर शेअर केलं होत. त्याच्या आगामी सिनेम्याच्या लिस्ट मध्ये आशिकी ३ ह्या हिट फ्रांचायजी च हि नाव समाविष्ट झालं आहे. Ashiki 3 मध्ये त्याच्या सोबत ऍनिमल सिनेम्यापासून इंडियाची नॅशनल क्रश बनलेली Tripti dimri हि दिसणार आहे. आशिकी हि हिट फ्रॅन्चायजी आहे, ह्या फ्रांचायजी चा पहिला सिनेमा आशिकी 1990 मध्ये आला होता. महेश भट दिग्दर्शित हा सिनेमा तेव्हा गाजला तो त्याच्या हिट माईलस्टोन गाण्यांमुळे. कुमार सानू ह्यांच्या आवाजातील आशिकी चे गाणे खूप हिट झाले. कुमार सानू ह्यांना ह्यासाठी फिल्मफेयर अवॉर्ड हि मिळाला होता. त्यानंतर आलेला आशिकी २ ह्या सिनेम्याने आशिकी ची पुनरावृत्ती करत परत सिनेम्यात हिट गाणे देऊन सिनेमा हिट केला. आशिकी 2 हा सिनेमा 2013 मध्ये आला होता. आशिकी 2 ला दिग्दर्शित केले होते मोहित सूरी ह्या दिग्दर्शकानी. आशिकी 2 मुळे हिंदी सिनेसृष्टीला अर्जित सिंग सारखा मोठा जादुई आवाज मिळाला. त्यामुळे आशिकी 3 हा सिनेमा तयार करताना मेकर्स ह्या सिनेम्याच्या संगीतावर खूप काम करत असणार हे नक्कीच आहे. त्यासोबत ह्या सिनेम्याचं दिग्दर्शन करणार आहे अनुराग बसू. अनुराग ह्या सिनेम्याच्या स्क्रिप्टिन्ग वर सध्या काम करत आहे व तसेच ह्या सिनेम्याच्या गाण्यांवर सुद्धा काम सुरु आहे. कार्तिक व तृप्ती ह्यांची जोडी पहिल्यांदा सोबत काम करणार आहे. तृप्ती हिच बॉलिवूड मध्ये 2018 मध्ये लैला मजनू ह्या सिनेम्यातून पदार्पण झालं होत, मात्र तिला पाहिजे तशी ओळख ह्या सिनेम्यातून मिळाली नव्हती. त्यानंतर तिने अनेक भूमिका केल्या, मात्र तिला खरी ओळख मिळाली ती मागच्या ऍनिमल ह्या सिनेम्याने. तृप्ती चा ऍनिमल मध्ये छोटीशी भूमिका होती, मात्र ह्या भूमिकेने तृप्ती ला बॉलिवूड मध्ये चांगली ओळख निर्माण करून दिली. त्यामुळे तृप्ती डिमरी वर सिनेमांचा वर्षाव झाला आहे. तृप्ती सध्या “Bhulbhulaiya 3” ह्या सिनेम्याची कार्तिक आर्यन सोबत शूटिंग करत आहे. तसेच काही दिवसांअगोदर करण जोहर ने त्याच्या सोशियल मीडिया अकॉउंट वर धडक २ ह्या सिनेम्याची अनौसमेन्ट करत टिझर रिलीज केला आहे. त्यामध्ये तृप्ती हि सिद्धांत चतुर्वेदी सोबत दिसणार आहे. ऍनिमल हा तृप्ती साठी खूप लकी सिनेमा ठरला असून तिला हिरोईन म्हणून त्यामुळे ओळख मिळाली आहे. कार्तिक आर्यन हि सध्या आपल्या सिनेम्याच्या शूटिंग मध्ये खूप बिझी आहे. त्याच्या भूलभूलैया ३ ह्या सिनेम्याचं शूट सध्या सुरु आहे, तर त्याच्या आगामी सिनेमा चंदू चॅम्पियन ह्या सिनेम्याच्या प्रोमोशन मधेही तो सध्या व्यस्त आहे. “Ashiki 3″ ह्या सिनेम्याचं शूट पुढच्या वर्षी सुरु होऊन 2015 मधेच हा सिनेमा येऊ शकतो.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.