Karan johar ह्याने त्याच्या इंस्टाग्राम वर त्याच्या आगामी सिनेम्याचे पोस्टर शेअर केलं आहे. “Bad news” असे सिनेम्याचं नाव असणार असून सिनेम्यात विकी कौशल, तृप्ती डिमरी, एमी विर्क असणार आहे. सिनेम्याला करण जोहर प्रोड्युस करणार आहे तर सिनेम्याला आनंद तिवारी दिग्दर्शित करणार आहे. सिनेम्याचे फक्त पोस्टर लाँच केलं असून पोस्टर मध्ये Viki kaushal, Trupti dimari व ami virk रंगबिरंगी ड्रेस मध्ये वेगवेगळ्या पोज देत आहे. सिनेम्यात तीन पात्र असून ह्या लव्ह ट्रँगल मध्ये प्रेगन्सी हा कॉमन फॅक्टर असणार असून सिनेम्याच्या कथा ह्याभोवती फिरणार आहे असा अंदाज लावण्यात येत आहे. सिनेम्याची अजून कोणतीही ऑफिशीयली माहिती समोर आली नसून सिनेम्याची कथा व त्यातील इतर गोष्टी अजून गुपित आहे. सिनेमा हा 2019 मध्ये आलेल्या “GOOD NEWS” ह्या सिनेम्यामध्ये असलेल्या विषयासारखाच प्रेग्नंसी व त्यावरील फॅमिली ड्रामा ह्यावर आधारित असणार आहे, हे पोस्टर वरून कळत आहे. पोस्टर वर सिनेम्याची रिलीज डेट दिली असून सिनेमा 19 जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तृप्ती डिमरी हि सध्या अनेक सिनेम्याचे शूट करत आहे. तिचा भूलभुलैया ३ ह्या सिनेम्यांचंही शूट सुरु आहे तर तिचा व कार्तिक आर्यन स्टारर “आशिकी 3” ह्या सिनेम्याचीही मेकर्स ने अनाउन्समेंट केली आहे. ऍनिमल ह्या सिनेम्यामध्ये छोटीशी भूमिका केलेली तृप्ती पुढे अनेक सिनेम्यात दिसणार आहे. तर विकी हाही त्याच्या अभिनय क्षेत्रात व्यस्तच असतो ,त्याच्या “छावा” ह्या संभाजी महाराज ह्यांच्या बायोपिक वर सध्या काम सुरु आहे.

2019 मध्ये आलेल्या “GOOD NEWS” ह्या सिनेम्याने बॉक्सऑफिस वर चांगली कमाई केली होती. सिनेम्याने 200 कोटी एवढा धंदा केला होता. सिनेम्याला राज मेहता ने दिग्दर्शित केले होते. सिनेम्यात Akshay kumar, karina kapur, kiyara adavani व Diljit dosanj हि मोठी स्टार कास्ट होती. सिनेम्यात दोन कपल ह्यांना मुलं न होण्याच्या समस्या असते व ते दोन्ही कपल एका नावाजलेल्या क्लीनिक मध्ये ivf ह्या आधुनिक टेक्नॉलॉजि चा वापर करून मुलं न होण्याच्या समस्येवर IVF चा मार्ग निवडतात. दोन्ही कपल च नाव सारखं असल्यामुळे त्यांचे शुक्राणू अदलाबदल होतात. अश्या कॉमेडी ड्रामा ह्या सिनेम्यात कॉमेडी सोबत हळूच वंधत्व्या सारख्या सामाजिक समस्येला क्रेंद्रित केलं होत. सिनेम्यात कॉमेडी सोबत इमोशनल टच होता. सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला होता. सिनेम्याचं म्युझिक चांगलंच हिट झालं होत. बॅड न्यूज ची कथा हि काहीशी अशीच असून सिनेम्यात प्रेग्नंसी हा विषय मध्य भागी असणार आहे.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईड  http://www.filmikida.com ला भेट द्या.