या लेखात

  •    Bhool Bhulaiyaa 3 and movie review
  •    Bhool Bhulaiyaa 3 and Singham again box office collection

           Bhool Bhulaiyaa 3 and movie review

“Singham again” व Bhool bhulaiyaa 3 हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले होते. ह्या दोन्ही मोठ्या सिनेम्यांना 1 नोव्हेंबर ला रिलीज केले होते हे दोन्ही सिनेमे मोठ्या स्टार सहित मोठ्या बजेट मध्ये बनलेले असले तरी दिवाळी ह्या हॉलिडे विकेंड मध्ये हे सिनेमे आल्यामुळे दोन्ही फिल्म च्या मेकर्सना तोट्याची भीती नसेल हे नक्की आहे. दोन्ही सिनेम्याच्या मेकर्सना अपेक्षेनुसार ह्या दोन्ही मोठ्या फिल्म मोठ्या पडद्यावर सक्सेस झाल्या असून ह्या दोन्ही सिनेम्याला रिलीज होऊन जवळ जवळ 15 दिवस पूर्ण झाले असून सिनेम्याच्या कमाई मध्ये अजूनही चांगली वाढ होताना दिसत आहे.
Anij bajami ह्यांच्या डायरेक्शन मध्ये बनलेल्या भूलभुलैया 3 हा सिनेमा हॉरर कॉमेडी जॉनरचा सिनेमा आहे. सिनेम्यामध्ये Kartik aryan , tripti dimari, vidhya balan, Madhuri dixit अशी मोठीं स्टार कास्ट आहे. हा सिनेमा भूल भुलैय्या हॉरर कॉमेडी जॉनरच्या फ्रांचायजी मधील हा पुढचा भाग होता. भूल भुलैया २ ह्या सिनेम्यानेही बॉक्स ऑफिस वर चांगला गल्ला जमवल्यामुळे दिग्दर्शक अनीज बाजामी ह्याने हि सक्सेसफुल फ्रॅन्चायजी पुढे कायम ठेवली आहे. भूलभुलैया ह्या पहिल्या भागात अक्षय कुमार हा कॉमेडी किंग होता मात्र नंतर आलेल्या दोन्ही भागात कार्तिक ह्याने आपल्या कॉमेडी टायमिंग ने सर्वाना चांगलच हसवले आहे. त्यामुळे ह्या सिनेम्याला पहिल्या दोन्ही भागापेक्षा चांगली कमाई मिळाली आहे. कोरोना काळात आलेल्या भूल भूलैया ३ ह्या सिनेम्याने त्या वर्षीच्या सर्व सिनेम्याचे रेकॉर्ड तोडले होते व कार्तिक ह्याच्या करिअर मधील सर्वात जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला होता. आता भूल भुलैया ३ ह्या सिनेम्याने मागच्या भागाच्या कमाईचे रेकॉर्ड ताडले असून कार्तिक च्या करिअर मधील सर्वात जास्त कमाई करणार सिनेमा ठरला आहे.

            भूल भुलैया 3 बॉक्स ऑफिस कलेक्शन

 

1 नोव्हेंबर ह्या दिवशी हा सिनेमा रिलीज झाला असून ह्या सिनेम्याला सिनेम्यागृहात 15 दिवस पूर्ण झाले आहे http://www.sacnilk.com  नुसार हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर हिट ठरला असून आधीच्या भागापेक्षा ह्या सिनेम्याने जास्त कमाई केली आहे.भूलभुलैया ह्या सिनेम्याने आपल्या ओपनिंग डे च्या दिवशी 36 कोटी एवढी तुफानी ओपनिंग केली होती. कार्तिक आर्यन ह्याच्या करिअर मधील हि सर्वात मोठी ओपनिंग आहे. त्यानंतर ह्या सिनेम्याने आपल्या दुसया दिवशी 38. 40 कोटी अवधी कमाई केली होती सिनेम्याने तिसऱ्या दिवशी सलग तिशी चा आकडा गाठला असून 35.20 कोटी एवढं कलेक्शन केलं होत. म्हणजे सिनेम्याने आपल्या तीन दिवसात 100 कोटी एवढा आकडा पार केला होता. सिनेम्याच्या कमाईत पुढे थोडी घट झाली. चौथ्या दिवशी सिनेम्याने 17 कोटी कलेक्शन केलं होत. नंतर सिनेम्याचे कमाईचे आकडे सलग 5,6, 7व्या ह्या दिवशी 15. 91 कोटी, 12. 74 कोटी, व 12.21 कोटी एवढी कमाई सिनेम्याने केली होती. सिनेम्याने पहिल्या हप्त्यात 168.86 कोटी एवढी कमाई केली होती. नंतर सिनेम्याने आपल्या सलग 8,9 व 10 व्या दिवशी 12.40कोटी, 17.40 कोटी, व 18.10 कोटी एवढे कलेक्शन हाती आले. त्यानंतर सिनेम्याच्या कमाई मध्ये घट झाली व सिनेम्याने नंतर एकेरी आकड्यामध्ये कमाई केली आहे. सिनेम्याने दुसऱ्या हप्त्यात 234.87 कोटी एवढं कलेक्शन केलं होत. तर सिनेम्याने एकूण आपल्या 15 दिवसात 245. 03 कोटी एवढा आकडा गाठला आहे. सिनेम्याने विदेशात 67.03 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. म्हणजे सिनेम्याने एकूण 356.25 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. सिनेमा अजूनही सिनेम्यागृहात कायम असून सिनेमा 400 कोटींचा आकडा नक्की पार करेल.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड  http://WWW.FILMIKIDA.COM ला भेट द्या.