रिऍलिटी शो मधील फेमस डान्सर Raghav juyal सध्या अभिनयाच्या दुनियेत व्यस्त आहे. तो मागेच सलमान खान ह्याच्या किसी का भाई किसी कि जान ह्या सिनेम्यात दिसला होता. राघव ने सुरवातीला आपल्या डान्स ने लाखो लोकांना दिवाने केले होते. अनेक डान्स च्या रियालिटी शो मध्ये तो सहभागी झाला होता व त्याच्या स्लो मोशन ह्या वेगळ्या डान्स स्टाईल ने त्याला डांस च्या दुनियेत एक खास ओळख मिळवून दिली . नंतर राघव ने अनेक डान्स शो मध्ये अँकरिंग हि केली. त्याच्या मनोरंजक अँकरिंग स्टाईल व अचूक कॉमेडी टायमिंग ने त्याला अभिनया मध्ये करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळाली असेल त्यामुळे राघव सध्या अनेक सिनेम्याचे ऑडिशन देत आहे असे त्याच्या कडून समजले आहे. राघव ने सांगितले कि डान्स व अँकरिंग माझे परफेक्ट जॉनर झाले आहे व ते मी केव्हा हि करू शकतो त्यामुळे ऍक्टिंग हि गोष्ट माझ्यासाठी थोडी चलेंजींग वाटते व मला अश्या नव्या गोष्टी करण्यामध्ये खूप मज्जा वाटते असे त्याने सांगितले. राघव ने त्याच्या आगामी सिनेम्या बद्दल मुलाखतीत सांगितले कि Kill हा त्याचा नवा सिनेमा असून त्यात तो एका व्हिलन च्या भूमिकेत आहे. किल ह्या सिनेम्यात Lakshya lalvani, Raghav juyala, Tanya maniktala हि स्टार कास्ट आहे. राघव ला अभिनयाचा अनुभव असला तरी लक्ष्य ललवाणी व तान्या माणिकताला हि दोन्ही स्टार कास्ट नवी आहे. किल ह्या ऍक्शन पट असून सिनेम्यात एक वेगळी गोष्ट सांगितली आहे.
Kill ह्या सिनेम्याला Nikhil bhat ह्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला असून त्याने प्रेक्षकांसाठी थोडा वेगळा विषय आणला आहे. सिनेम्याची सुरवात एक लव्ह स्टोरी पासून होते, व काही मिनिटांनींच सिनेमा ट्रेन मध्ये जाऊन पोहचतो व लव्हस्टोरी च रूपांतर ऍक्शन मध्ये होते. सिनेम्याची खास गोष्ट म्हणजे पूर्ण सिनेमा नंतर ट्रेन मधेच घडतो. सिनेम्याचा जवळ जवळ 90 टक्के भाग ट्रेन मध्ये दाखवला असून सिनेम्याचा एवढा मोठा वेळ ट्रेन मध्ये दाखवणारा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. एका छोट्याश्या लव्हस्टोरी पासून सुरु झालेल्या हा सिनेमा खूप क्रूर रक्तपात ऍक्शन पर्यंत प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे व धावत्या ट्रेन मधील हि रोमांचक ऍक्शन भारतीय प्रेक्षक पहिल्यांदा अनुभवणार आहे. सिनेम्यात एवढं वायलेन्स दाखवला आहे कि मेकर्स ना सिनेम्याच्या सुरवातीला चेतावणी स्वरूपात प्रेक्षकांना सिनेम्यात व्हायलेन्स असायचं कळवाव लागलं आहे. भारतीय सिनेम्यात आतापर्यंत अनेक ऍक्शन पट आले आहे मात्र सिनेम्यात ऍक्शन सोबत लव्हस्टोरी, क्राईम थ्रिलर किंवा सस्पेन्स हि दाखवला जातो मात्र फक्त ऍक्शन असणारा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. लव्हस्टोरी ला भरभरून प्रेम करणारा भारतीय प्रेक्षक किल ह्या सिनेम्याला कसा प्रतिसाद देतो हे सिनेमा आल्यावरच कळेल.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या  http://www.filmikida.com वेबसाईड ला भेट द्या.