Junaid khan ह्याच “महाराज” ह्या सिनेम्यातून ott द्वारे अभिनयातून पदार्पण

14 जून रोजी नेटफ्लिक्स वर “Maharaj” ह्या Junaid khan स्टारर सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेम्यात जुनैद खान हा Amir khan ह्याचा मुलगा मुख्य भूमिकेत असून सिनेम्यात जयदीप अहलावत, शालिनी पांडे, शर्वरी वाघ, स्नेहा देसाई हि स्टार आहे. ह्या सिनेम्याला सिद्धार्थ मल्होत्रा ह्याने दिगदर्शित केले असून सिनेम्याला यश राज फिल्म ने प्रोड्युस केला आहे. महाराज ह्या ऐतिहासिक ड्रामा सिनेम्यातून जुनैद ह्याने आपल्या करियर ची सुरुवात केली असून सिनेम्यातील अभिनयासाठी त्याची प्रेक्षक प्रशंसा करत आहे. अभिनयाचे व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या जुनैद हा आमिर खान ह्या सुपरस्टार चा मुलगा असला तरी त्याने आपले अभिनयातले करिअर ऑडिशन ह्या सर्वसामान्य मार्गाने सुरु केलं असून त्याने ह्या अगोदर अनेक सिनेम्यांचे ऑडिशन दिले आहे. जुनैद ह्याने पहिल्यांदा आमिर खान ह्याचा सिनेमा लाल सिंग चड्डा ह्या सिनेम्यात आमिर ह्याच्या लहानपणाची भूमिका केली व त्यातून बॉलिवूड मध्ये आपलं पदार्पण केलं आहे. जुनैद ह्याच्या नावाची चर्चा अनेक दिवसांपासून सोशिअल मीडियावर सुरु आहे.जुनैद आमिर खान ह्या मोठ्या अभिनेत्याचा मुलगा असला तरी बऱ्याच वेळा त्याच्या साध्या राहणीमानाचे विडिओ सोसिअल मीडियावर वायरल झाले होते. जुनैद ह्याने त्याचा दुसरा सिनेमा khushi kapur हिच्या सोबत साइन केला असून ह्या सिनेम्याचे काम सुरु झाले आहे अशी माहिती समोर आली आहे.

महाराज ह्या सिनेम्याची गोष्ट

नेटफ्लिस वर रिलीज झालेल्या “Maharaj” ह्या सिनेम्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जुनैद खान ने आपल पदार्पण ott ह्या माध्यमातून केलं असलं तरी ott ह्या प्लॅटफॉर्म सध्या खूप स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म झाला असून ह्यावर रिलीज झालेल्या सिनेमांची दखल प्रेक्षक घेतात व चांगल्या कन्टेन्ट ची प्रेक्षक प्रशंसा करून सिनेम्याची रेटिंग सुद्धा वाढवतात. महाराज हा सिनेमा 1862 साली एका प्रसिद्ध खटल्यावर आधारित आहे. जुनैद खान हा करसनदास मुलजी ह्या समाज सुधारकांच्या भूमिकेत असून जयदीप अहलावात एका प्रस्थापित महाराज ह्याच्या भूमिकेत आहे. इंग्रज काळात भारतीय समाजात, जाती व्यवस्था खूप स्ट्रॉंग होती. भारतीय समाजात जातीची एक उंच उतरंड बघायला मिळत होती, व ह्यातील प्रस्थापित उच्चभ्रू समाजाने समाजाचे महत्वाचे धार्मिक व शैक्षणिक अधिकार आपल्या जवळ ठेवून इतर सामान्य लोकांवर हे लोक अन्यायाने वागवत असत. अश्याच एक नावाजलेल्या धर्मगुरू व त्याच्या अंधश्रंधिक कर्मकांडाची हि गोष्ट आहे. त्या विरुद्ध करासनदास मुलजी ह्या समाजसुधारकाने आवाज उठवून न्यायालयात खटला भरला होता. अश्या न्यायालयीन ऐतिहासिक खटल्याची हि गोष्ट आहे. जुनैद ह्याने आपल्या पदार्पणातच ऐतिहासिक भूमिका करत सर्वाना अचंबित केलं आहे. सिनेमा 14 जून ला नेटफ्लिक्स वर रिलीज झाला असून सिनेम्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

फिल्मी दुनियेविषयी अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.