मॅडोक फिल्म चा अजून हॉरर सिनेम्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. “MUNJYA” असं ह्या नवीन सिनेम्याचं नाव असून मॅडोक इतर आलेल्या सिनेम्याप्रमाणे हा हॉरर कॉमेडी सिनेमा असून प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढवणारा आहे. एके काळी हॉरर सिनेम्याचा स्पेसिअल चाहता वर्ग होता. नेमही येणारे रोमँटिक ऍक्शन सिनेम्यांना चाहता वर्ग कंटाळून जायचा त्यामुळे, प्रोड्युसर व दिग्दर्शक मध्ये मध्ये चाहत्यांसाठी अशे सिनेमे घेऊन यायचे. पूर्ण हॉरर व गंभीर स्वरूपाचे असे सिनेम्याच्या कथानकामुळे चांगले गाजायचे. भट फॅमिली च्या अश्या हॉरर सिनेम्यांना लोकांनी चांगलाच डोक्यावर घेतलं होत, मात्र मधल्या काळात अशे हॉरर सिनेमे मेकर्सकडून चांगल्या स्वरूपात बनत नव्हते. नंतर अश्या प्रकारच्या सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. आधुनिक काळात टेक्नोलोंजि वर सिनेमे येऊ लागले व अश्या गावातील दंतकथा वर सिनेमे करणे बंद पडलं. मात्र मॅडोक फिल्म ने 2018 साली हा सिनेमा केला. श्रद्धा कपूर हा हॉरर सिनेमा चांगला हिट झाला, व परत लोकांना अश्या गावाकडील दंतकथावरील सिनेमे आवडू शकतात ह्याची खात्री झाली. नंतर मॅडोक ने रुही, भेडिया अशे हॉरर सिनेमे केले आहे. मात्र स्त्री सारखे हे सिनेमे हिट झाले नाही. परत मॅडोक फिल्म ने मुंजा ह्या आपल्या हॉरर सिनेम्याद्वारे प्रेक्षकांना थोडा वेगळा विषय बघण्यासाठी मजबूर केले आहे. मॅडोक ची एक विशेषतः म्हणजे त्यांच्या हॉरर सिनेम्यात त्यांनी कॉमेडी टाकलेली असते त्यामुळे प्रेक्षकांना घाबरून टाकताना असे सिनेमे मधेच हसवत असतात.
मुंज्या हि महाराष्ट्रातील एक दंतकथा आहे. त्यावर आधारित हा सिनेमा असून सिनेम्यामध्ये मुंजा हे हॉरर पात्र आहे. मुंजा च्या मागच्या जीवनात त्याची एक अपूर्ण दाखवली आहे. त्याच मुन्नी नावाच्या मुलीशी लग्न पक्कं होत मात्र ते पूर्ण न होता मुंजा चा मृत्यू होतो व त्यामुळे ह्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मुंजा काय काय करतो, हे सिनेम्यात दाखवले आहे. सिनेम्यात मुंजा ह्या पात्रासाठी CGI चा वापर करण्यात आला आहे. ह्या सिनेम्यात Abhay varma, Sharvari, Mona sing, सत्यराज, सुहास जोशी हि स्टार कास्ट असून, आदित्य सरपोद्दार ह्या मराठमोळ्या दिग्दर्शकाने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. आदित्य ने याआधी मराठी मध्ये अश्या CGI चा वापर करून झोम्बवली हा सिनेमा केला होता. आदित्य हा मराठीतील एक यशस्वी दिग्दर्शक असून त्याच्या झोंबिवली ह्या सिनेमा म्हणजे मराठीतील अश्या प्रकारचा हॉरर सिनेमा चांगला प्रयोग होता. मुंज्या हा त्याचा हिंदीतील cji प्रयोग किती यशस्वी होतो हे सिनेमा रिलीज झाल्यावर कळेल.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.