या लेखात
- सिंघम अगेन हा सिनेमा बनला सक्सेसफुल फ्रंचायजी चा हिस्सा.
- सिंघम अगेन ने आपल्या 6 दिवसात फक्त भारतात कमावले 170.95 कोटी रुपये.
सिंघम अगेन हा सिनेमा बनला सक्सेसफुल फ्रंचायजी चा हिस्सा.
सिंघम ह्या Rohit Shetty ह्याच्या दिगदर्शनाखाली बनलेला हा सिनेमा 2011 साली प्रदर्शित झाला होता. ह्या सिनेम्यात असलेल्या बाजीराव सिंघम ह्या पोलिसांच्या भूमिकेत असलेल्या Ajay Devgan हे पात्र चांगलं हिट झाल व सिनेमाहि हिट झाला होता. त्यामुळे ह्या गाजलेल्या पात्राचा पुढचा भाग रोहित शेट्टी ने पुन्हा बनवण्याचं ठरवलं व प्रेक्षकांसाठी सिंघम रिटर्न, हा सिंघम ह्या सिनेम्याचा पुढचा भाग घेऊन आला. हाही सिनेमा त्या वेळेस चांगला हिट झाला त्यामुळे रोहित ने ह्या हिट फ्रांचायजी ला पुढे कायम सुरु ठेवत सिंघम अगेन हा सिनेमा आणला आहे. सिनेम्याने रिलीज झाल्यावर काही दिवसातच शंभरीचा आकडा गाठला असून हा सिनेमा मोठ्या ब्लॉकबस्टर होण्याच्या वाटेला आहे. ह्या सिनेम्यात अजय देवगण व Karina kapoor मुख्य भूमिकेत असून त्यांच्या सोबत अक्षय कुमार, रणवीर सिंग, सलमान खान, दीपिका पादुकोण अश्या मोठ्या स्टारकास्ट ने ह्या सिनेम्यात आपला केमिओ दिला आहे. सिनेमा मोठा ऍक्शन सिनेमा असून सिनेम्यात मोठं मोठे ऍक्शन सिक्वेन्सेस आहे. त्यामुळे हा सिनेमा मोठ्या स्क्रिन साठी बनला आहे हे नक्की आहे. रोहित ने आपल्या गोलमाल व सिंघम ह्या फ्रांचायजी ला कायम ठेवत ह्या फ्रांचायजी च्या यशालाही कायम ठेवलं आहे. ह्या दोन्ही फ्रांचायजी मधील आतापर्यंत एकही सिनेमा फ्लॉफ झाला नाही.अजय देवगणनेही आपल्या हिट सिनेमांचा धुराळा कायम ठेवत ह्या वर्षातील वर्षाशेवटी अजून एक हिट सिनेमा दिला आहे. सिंघम अगेन हा सिनेमा 1 नोव्हेंबर ला प्रदर्शित झाला असून ह्या सिनेम्याचे 6 दिवसाचे कलेक्शन हाती आले आहे.
सिंघम अगेन ने आपल्या 6 दिवसात फक्त भारतात कमावले 170.95 कोटी रुपये.
सिंघम अगेन हा सिनेमा 1 नोव्हेंबर ह्या दिवशी पूर्ण भारतात प्रदर्शित झाला आहे. ऐन दिवाळीच्या धामधुमीत हा मोठा सिनेमा रिलीज झाला असून दिवाळी च्या सुट्ट्यामध्ये हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून. प्रेक्षकांच्या अपेक्षे प्रमाणे हा सिनेमा ठरला असून सिनेम्याच्या ऍक्शन व स्टोरी ला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. दिवाळीच्या ह्या सुट्ट्यांच्या पर्वामध्ये भूलभुलैया ह्या सिनेमा सोडल्यावर अजून कोणताही मोठा सिनेमा सिंघम अगेन ह्या सिनेम्याच्या स्पर्धेला असणार आहे. भूलभुलैया ३ ह्या सिनेम्यानेही सिंघम अगेन ह्या सिनेम्याला टक्कर देत साजेश कलेक्शन केलं आहे. बघूया सिंघम अगेन ह्या सिनेम्याचं कलेक्शन.
1 नोव्हेंबर ह्या दिवशी सिंघम अगेन हा सिनेमा रिलीज झाला होता. सिनेम्याने आपल्या पहिल्या दिवशी 43.60 कोटी एवढं कलेक्शन केलं होत. अशी मोठी ओपनिंग मिळालेल्या सिंघम अगेन ह्या सिनेम्याने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली त्यामुळे चांगल्या रिव्ह्यू मिळाल्यावर सिनेम्याने आपल्या दुसऱ्या दिवशी 44.50 कोटी एवढं कलेक्शन केलं होत. एवढी ओपनिंग करत अजय देवगण ह्याने आपल्या करिअर मधील बॉक्सऑफिस कलेक्शन रेकॉर्ड मोडलं आहे. त्यानंतर सिनेम्याने अनुक्रमे 3 दिवशी 36.80 कोटी, चौथ्या दिवशी 19.20 कोटी एवढे पाचव्या दिवशी 15.50 कोटी रुपये तर सहाव्या दिवशी 10.25 कोटी रुपये जमवले आहे.सिनेम्याने पूर्ण आपल्या 6 दिवसात एकूण कोटी 175एवढा गल्ला जमवला आहे सिंघम अगेन हा सिनेम्याची यशस्वी घोडदौड सुरु असून सिनेमा अजून नवे रेकॉर्ड बनवेल. सिंघम अगेन ह्या सिनेम्याने अजय देवगण ह्याच्या जीवनातील सर्वात मोठे ओपनिंग कलेक्शन केलं आहे.
फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.