या लेखात

  •   दि साबरमती रिपोर्ट मूवी रिव्हू.
  •   “The Sabarmati report” movie, 7 days box office collection.

“दि साबरमती रिपोर्ट” मूवी रिव्हू.

  Vikrant Massey स्टारर “दि साबरमती रिपोर्ट” हा सिनेमा रिलीज होऊन एक हप्ता पूर्ण झाला आहे. गोध्रा कांड ह्या सत्य घटनेवर आधारित ह्या सिनेम्यात विक्रांत बरोबर राशी खन्ना, रिद्धी डोग्रा ह्या सिनेम्यात पत्रकाराच्या भूमिकेत असून एकूणच हा सिनेमा पत्रकारिता व भारतीय पॉलिटिक्स ह्या वर भाष्य करणारा आहे. 2002 मध्ये गुजरात मढील गोद्रा येथे एका दंगलीत रेल्वे डब्यात आग लावण्यात आली होती त्यामध्ये 59 निष्पाप लोकांचा जीव गेला होता, तत्कालीन मीडिया व पॉलिटिक्स ने ह्या घटनेला आपआपल्या परीने फायदा करून लोकांसमोर मांडले होते अश्या अनेक चुकीच्या मुद्द्यावर व मीडिया व पॉलिटिक्स मधील अनेक चुकीच्या गोष्टीवर हि फिल्म प्रकाश टाकणार आहे. ह्या सिनेम्याला एकता कपूर हिने प्रोड्युस केलं असून सिनेमा प्रदर्शित झाल्या पासून अनेक मोठ्या नेत्यांना हि फिल्म दाखवण्यात आली आहे. भारतीय पंतप्रधान ह्यांनी हि मूवी बघितली असून त्यांनी ह्या सिनेम्याच्या समर्थन करताना लोकांनी हा सिनेमा बघावा असं आवाहन केलं आहे. तसेच हरियाणा चे मुख्य मंत्री ह्यांनीही हा सिनेमा, सिनेम्यातील स्टार कास्ट सोबत बघितला असून त्यांनी त्यांच्या राज्यात हा सिनेमा टॅक्स फ्री केला आहे. हरियाणा सरकार बरोबर, मध्यप्रदेश सरकारनेही हा सिनेमा टॅक्स फ्री केला असून जनतेने हा सिनेमा आवर्जुन बघावा असं सांगितले आहे. सिनेम्याच्या वाढत्या बॅब्लिसिटी व सेलिब्रिटी प्रोमोशन मुळे सिनेम्याच्या कलेक्शन मध्ये वाढ होऊ शकते.

 

“The Sabarmati report” movie, 7 days box office collection.

दि साबरमती रिपोर्ट हा सिनेमा 15 नोव्हेंबर ला सिनेम्यागृहात रिलीज झाला आहे. सिनेम्याला जवळ जवळ एका हफ्ता पूर्ण झाला असून सिनेम्याची हळू हळू पब्लिसिटी वाढत आहे.  http://WWW.SACNILK.COM  सिनेम्याने आपल्या एक हफ्त्यात 10 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. सिनेम्याचे हे कलेक्शन कमी मानलं जात असाल तरी कोणतीही मोठी स्टार कास्ट नसलेल्या व मसालेदार सब्जेक्ट नसलेल्या ह्या सिनेम्याने चांगलं कलेक्शन केलं आहे. सिनेम्याने आपल्या पहिल्या दिवशी 1.25 कोटी एवढं कलेक्शन केलं होत. त्यानंतर सिनेम्याने आपल्या दुसऱ्या दिवशी 2.1 एवढं कलेक्शन केलं. सिनेम्याने तिसऱ्या दिवशी सर्वात जास्त 3 कोटी एवढं कलेक्शन केलं. सलग आपल्या ४थ्या, पाचव्या, सहाव्या व सातव्या दिवशी 1. 15कोटी , 1.3 कोटी, 1.55 कोटी व 0.15 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे सिनेम्याने एकूण आपल्या दहा दिवसात 10.5 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. सिनेम्याच्या एकूण वाढत्या पब्लिसिटी व एकूणच टॅक्स फ्री मुळे ह्या सिनेम्याला नक्कीच फायदा होणार आहे.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड   http://WWW.FILMIKIDA.COM ला भेट द्या.