या लेखात

  • अभिषेक बच्चन व सुजित सिरकार ह्या जोडीचा अजून एक सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला.
  • i want to talk ह्या अभिषेक बच्चन ह्याच्या नव्या सिनेम्यात आहे काही विशेष लपलेलं.

अभिषेक बच्चन व सुजित सिरकार ह्या जोडीचा अजून एक सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

बॉलिवूड मध्ये काही फिल्म मेकर्स व दिग्दर्शक ह्यांच्या काही विशेष जोड्या आहे. म्हणजे एखादा हिट सिनेमा दिल्यानंतर डायरेक्टर व अभिनेता ह्यांची एवढी घट्ट मैत्री होते कि त्यांचे जिव्हाळ्याचे समंध तयार होतात. व समोर अनेक वर्ष ते एकमेकांसोबत अनेक सिनेमे करतात. बॉलिवूड मध्ये अश्या अनेक डायरेक्टर व ऍक्टर च्या जोड्या आहे. अशीच बच्चन फॅमिली व Sujit sircar ह्या डायरेक्टर ची काही खास जोडी बनली आहे. सुरजित सिरकार हा आपल्या भारदस्त सिरिअस सिनेम्यांन साठी ओळखला जातो. सुरजित सिरकार ह्यांच्या सिनेम्यात फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन होत नाही तर काही खास सामाजिक मुद्दे व वैचारिक गोष्टी अश्या सिनेम्यात असतात. सुरजित ने आतापर्यंत पिंक, पिकू, सरदार उधम, गुलाबो सीताबो अश्या अश्या अनेक हिट सिनेमे बॉलिवूड ला दिले आहे. त्यापैकी निम्मे सिनेमे सुरजित ने बच्चन फॅमिली सोबत केले आहे, त्यामुळे बच्चन फॅमिली व सुरजित सिरकार ह्यांचं चांगलंच बॉण्डिंग तयार झालं आहे. त्यामुळे ह्या मैत्री ला पुढे कायम ठेवत आता सुजित सिरकार “I want to talk” ह्या त्यांच्या नव्या सिनेम्यासाठी चर्चेत आहे. ह्या सिनेम्यात Abhishek bachchan ह्याची विशेष भूमिका असून सिनेम्याचा टिझर आल्यापासून अभिषेक बच्चन ह्याच्या भूमिकेविषयी सोशियल मीडिया वर सध्या ह्याची चर्चा सुरु आहे. सिनेम्याचा टिझर काही दिवसांअगोदर रिलीज झाला असून, सिनेम्याचा विषय सुरजित सिरकार ह्यांच्या बाकीच्या सिनेम्यासारखाच सिरीयस मुद्द्यावर भाष्य करणारा दिसत आहे.

i want to talk ह्या अभिषेक बच्चन ह्याच्या नव्या सिनेम्यात आहे काही विशेष लपलेलं.

i want to talk ह्या सिनेम्याचा टिझर रिलीज झाला असून हा अभिषेक बच्चन ह्याचा नवा सिनेमा आहे. सिनेम्यात अभिषेक बच्चन हा एका आजारी व्यक्ती च्या भूमिकेत असून तो जगन आणि मरण ह्यामधील फरक सांगताना काही तरी भाष्य करत आहे. जिवंत माणूस व मेलेला माणूस ह्यामधील मुख्य फरक सांगताना अभिषेक म्हणत आहे, जिवंत मानस बोलतात व मेलेली बोलत नाही असा सर्वात मोठा फरक मला वाटतो. अश्या प्रकारे बोलण्याचं महत्व पटवून देताना पात्र काही खास गोष्टी प्रेक्षकांच्या लक्षात आणून देत आहे. सिनेम्यात अभिषेक बच्चन हा अर्जुन नावाच्या भूमिकेत दिसत असून अर्जुन हा काही सर्जरी मुळे बोलू शकत नाही आहे. त्यामुळे सहज बोलू शकणाऱ्या माणसाला तो बोलण्याचे महत्व व चांगलं बोलण्याचं महत्व सांगत आहे. सिनेम्याची कथा एकदम साधारण पण विशेष मुद्द्यावर असून अभिषेक बच्चन ह्याने पूर्ण कॅरेक्टर मध्ये जाऊन हि भूमिका केली आहे. ह्या सिनेम्यासाठी अभिषेक बच्चन ह्याने थोडं वजन वाढवलं असून काही शारीरिक बदल हि केले आहे. ह्या सिनेम्यात अभिषेक सोबत जॉनी लिव्हर असणार असून बाकी कोणतीही मोठी स्टार कास्ट ह्या सिनेम्यात असणार नाही. सिनेम्याचं गाणं रिलीज झालं असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद ह्या गाण्याला मिळाला आहे. सिनेमा 22 नोव्हेंबर ह्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईड  http://www.filmikida.com ला भेट द्या.