या लेखात
- कल्की २८९८ AD हा सिनेमा प्रदर्शित होऊन ५ दिवस पूर्ण. सिनेम्याला मिळालेले रिव्ह्यू.
- सिनेमा तामिळ, तेलगू ,हिंदी, कन्नळ,मल्ल्याळम असा पॅन इंडिया प्रदर्शित. बघा कोणत्या भाषेत किती झाली कमाई.
कल्की २८९८ AD हा सिनेमा प्रदर्शित होऊन ५ दिवस पूर्ण. सिनेम्याला मिळालेले रिव्ह्यू.
साऊथ सुपरस्टार Prabhas, Dipika paukon, Amitabh bacchan अशी मोठी स्टार कास्ट असलेला Kalki 2898 AD हा सिनेमा प्रदर्शित होऊन 5 दिवस पूर्ण झाले आहे. ह्या बिग बजेट सिनेम्याला साऊथ दिग्दर्शक Naga ashwin ह्याने दिग्दर्शित केला आहे. हा मल्टीस्टारकास्ट व बिग बजेट सिनेमा भारतीय पौराणिक कथा व आधुनिक टेक्नोलोजि ह्यांचं मिश्रण असलेला सायन्स फिक्शन हा सिनेमा प्रेक्षकांना आवडत आहे. सिनेम्याला प्रदर्शित होऊन 5 दिवस पूर्ण झाले असून प्रेक्षकांनी ह्या सिनेम्यासाठी चांगले रिव्ह्यू दिले आहे. सिनेमा बघून आल्यावर प्रेक्षक सिनेम्याला पॉसिटीव्ह रिव्ह्यू देत असून सिनेमा एका वेगळ्या काल्पनिक विश्वात घेऊन जातो व भारतीय सिनेम्याला हॉलिवूड ची अनुभूती देतो असे बऱ्याच प्रेक्षकांनी म्हटले आहे. सिनेम्याला प्रमोट करण्यासाठी अनेक सेलिब्रेटी समोर येत असून सिनेमा बघून आल्यावर त्यांच्या सोशियल मीडिया वर ते त्यांचे अनुभव शेअर करत आहे. सिनेमा हिंदी, तमिळ, तेलगू,मल्ल्याळम, व कन्नळ असा पॅन इंडिया प्रदर्शित झाला असून सिनेम्याने हिंदी सोबत सर्व लँग्वेज मध्ये चांगली कमाई केली आहे. सिनेम्याचा डंका विदेशातही कायम असून सिनेम्याने देशाबाहेरही चांगले आकडे कलेक्ट केले आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन फक्त 5 दिवस पूर्ण झाले असून ह्या बिग बजेट सिनेम्याने आपलं जवळपास 6O टक्के बजेट भरून काढलं आहे.
-
सिनेमा तामिळ, तेलगू ,हिंदी, कन्नळ,मल्ल्याळम असा पॅन इंडिया प्रदर्शित. बघा कोणत्या भाषेत किती झाली कमाई.
“KALKI 2898 AD” सिनेमा प्रदर्शित होऊन 5 दिवस पूर्ण झाले आहे. सिनेमा 27 जून ला पूर्ण जगामध्ये 8500 स्क्रीनवर रिलीज केला होता. ह्या बिग बजेट सायन्स फिक्शन सिनेम्याची प्रेक्षक बऱ्याच दिवस आधी वाट बघत होते. सिनेमा प्रदर्शित झाल्या पासून सिनेम्याला बघण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. http://www.sacnilk.com नुसार सिनेम्याच्या 5 दिवसांच्या कमाईचे आकडे समोर आले असून सिनेम्याने भारतीय सिनेम्याच्या अनेक मोठ्या ब्लॉकबस्टर सिनेम्याच्या कमाईचे रेकॉर्ड तोडले आहे. सिनेमा हिंदी, तमिळ, तेलगू,मल्ल्याळम व कन्नळ अश्या पाच भाषेमध्ये प्रदर्शित झाला असून सिनेम्याने ह्या सर्व भाषेमध्ये चांगले कलेक्शन केले आहे.
sacnil नुसार सिनेम्याने आपल्या ओपनिंग डे च्या दिवशी फक्त भारतात 95.3 कोटी एवढं कलेक्शन केलं होत. सिनेम्याने त्याच बरोबर पहिल्याच दिवशी पूर्ण वल्डवाईड 191 कोटी एवढं कलेक्शन केलं होत. ह्या सोबत कल्की हा भारतातील पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा तिसरा सर्वात मोठा सिनेमा बनला आहे. ह्या अगोदर RRR ह्या सिनेम्याने ओपनिंग डे ला 223 कोटी एवढी कमाई करणारा हा पहिला सिनेमा आहे. तर बाहुबली 2 हा सिनेम्याने आपल्या ओपनिंग डे च्या दिवशी 217 कोटी एवढी कमाई केली आहे. सिनेम्याने दुसऱ्या दिवशी फक्त भारतात 59.3 कोटी एवढे कलेक्शन केलं आहे. तिसऱ्या दिवशी सिनेम्याने फक्त भारतात 66.2 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. सिनेम्याच्या चौथ्या दिवशी 88.2 कोटी एवढं कलेक्शन हाती आलं आहे. तर पाचव्या दिवशी सिनेम्याने 34.6 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे.
सिनेम्याचे भाषेनुसार कलेक्शन
सिनेम्याने फक्त तेलगू मध्ये – 182 कोटी
तामिळ मध्ये – 20.3 कोटी
हिंदी मध्ये – 128 कोटी
कन्नळ – 2.1 कोटी
असं सर्व मिळून सिनेम्याने एकूण फक्त भारतात 343.6 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. तर पूर्ण वल्डवाईड सिनेम्याने चौथ्या दिवशी 555 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे.
फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या http://WWW.FILMIKIDA.COM वेबसाईड ला भेट द्या.