“Baby john” बद्दल थोडं
Varun dhavan ह्याचा Baby john ह्या सिनेम्याची बऱ्याच वेळा रिलीज डेट समोर आली होती, मात्र ह्या सिनेम्याच्या पोस्ट प्रोडक्शन च काम बाकी असल्यामुळे सिनेम्याच्या रिलीज डेट मध्ये वारंवार चेंज करण्यात आले. सिनेम्याचे टिझर बरेच दिवस आधी मेकर्स ने रिलीज केला होता, त्यामध्ये सिनेमा 2024 च्या मे पर्यंत येईल असा कयास लावण्यात येत होता. मात्र सिनेम्याच्या पोस्ट प्रोडक्शन गोंधळामुळे सिनेम्याच्या रिलीज बद्दल अनेक दिवस अपडेट आले नव्हते. “Baby john” हा वरून धवन ह्याचा मास ऍक्शन सिनेमा असून ह्या सिनेम्याला जवान दिग्दर्शक Atlee kumar प्रोड्युस करणार असून सिनेम्याला कणीस दिग्दर्शित करणार आहे तर सिनेम्याला साऊथ म्युझिशियन थमान म्युझिक देणार आहे. हा सिनेमा Thalapati vijay ह्याचा “Theri; ह्या साऊथ सिनेम्याचा रिमेक आहे. थेरी ला सुद्धा atalee kumar नेच दिग्दर्शित केले होते. थेरी हा साऊथ मध्ये ब्लॉकबस्टर झाला होता. आता ह्याचा हिंदी मध्ये रिमेक येण्यासाठी सज्ज आहे.सिनेम्यात वरून धवन सोबत, कीर्ती सुरेश, जॅकी श्रॉफ, राजपाल यादव हि स्टार कास्ट असणार आहे. कीर्ती सुरेश च बेबी जॉन मधून हिंदी सिनेमांमध्ये पदार्पण होणार असून वरून हा पहिल्यांदा साऊथ इंडस्ट्रीसोबत काम करणार आहे. बेबी जॉन हा मास ऍक्शन बिग बजेट सिनेमा असून वरून ने ह्या अगोदर मोठ्या लेव्हल वरील असा मास ऍक्शन सिनेमा अजून केलेला नव्हता, त्याने आतापर्यंत फक्त रोमँटिक भूमिका जास्त केल्या असून, असा बिग बजेट ऍक्शन, हा त्याचा पहिलाच सिनेमा असणार आहे. सिनेम्याचे बजेट जवळ जवळ 300 कोटी एवढे आहे असे माहिती वरून समोर आले होते.
Varun dhawan ह्याचं ऍक्शन सिनेम्याद्वारे कमबॅक
स्टुडंट ऑफ दि ईअर ह्या सिनेम्यातून आपलं अभिनयातील करियर सुरु करणारा वरून धवन ह्याने नंतर अनेक हिट सिनेमे दिले आहे. त्याने जास्त रोमँटिक फॅमिली ड्रामा अशेच सिनेमे केले आहे. मात्र ऍक्शन त्याच्या वाट्याला फार कमी आलं आहे. त्याच्या नावावर एकही ऍक्शन हिट सिनेमा नाही. मागचे बरेच दिवस त्याच्या सिनेम्यासाठी त्याचा चाहता वर्ग वाट बघत होता. मागील अनेक दिवस तो फिल्मी दुनियेपासून दूर होता. 2023 मध्ये त्याचा bawal हा जान्हवी कपूर सोबत लव्ह स्टोरी सिनेमा आला होता, मात्र हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्म वर रिलीज करण्यात आला होता. ह्या सिनेमा मागच्या वर्षी सर्वात जास्त OTT वर बघितला गेलेला सिनेमा आहे. मात्र मोठ्या पडद्यावर त्याचा सिनेमा बरेच दिवस झाले आला नसून भेडिया हा त्याचा लास्ट सिनेमा होता. हॉरर जॉनर असलेल्या भेडिया ची बॉक्स ऑफिस वर मात्र निराशा झाली होती त्यामुळे वरून एका हिट सिनेम्याच्या शोधात आहे कि ज्याने त्याचे बॉलिवूड मध्ये चांगलं कमबॅक होईल. वरून ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर “Baby john” ह्याचं पोस्टर शेयर केलं आहे त्यामध्ये सिनेमा 25 डिसेंबर म्हणजे ख्रिसमस च्या दिवशी रिलीज होणार आहे असे कळले आहे.
फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.