Karan johar ह्याच Dharma production एका मागून एक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असते. करण स्वतः सिनेमे दिगदर्शित करत असतो. त्याने दिग्दर्शित केलेले सिनेमे दोन तीन वर्षांनी प्रेक्षकांना बघायला मिळतात. मात्र त्याच प्रोडक्शन हाऊस धर्मा प्रोडक्शन हे खूप व्यस्त असते व वर्षातून अनेक सिनेमे करण प्रोड्युस करत असतो. आता धर्मा प्रोडक्शन च्या मालक म्हणजे करण ने त्याच्या सोसिअल मीडिया अकॉउंट वर त्याच्या पुढच्या सिनेम्याची जाहिरात करत सिनेम्याचं टिझर आऊट केलं आहे. “Dhadak 2” हा त्याच्या आगामी सिनेमा असणार आहे, हा सिनेमा “Saziya ikbal” दिग्दर्शित करणार आहे. सिनेम्यात “Tripti dimri” “Siddharth chaturvedi हि फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे. तृप्ती व सिद्धार्थ ह्यांनी बॉलिवूड मध्ये काही काळापासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे, मात्र दोघांच्या वाट्याला सहाय्यक भूमिकाच जास्त आल्या आहे. सिद्धार्थ चतुर्वेदी ह्याची गल्ली बॉय ह्या सिनेम्यातील भूमिका लक्षवेधी होती तर तृप्ती डिमार हिची मागच्या वर्षी आलेल्या ऍनिमल सिनेम्यामुळे तिची चांगली ओळख निर्माण झाली असून तिला नंतर अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या आहे. ती भूलभुलैया ३ ह्या तिच्या शूटिंग मध्ये सध्या व्यस्त आहे. तर सिद्धार्त चतुर्वेदी हा हि सुद्धा मिळेल तशा चांगल्या भूमिका करत आहे, त्यामुळे सिद्धार्थ व तृप्ती हे दोन्ही चेहरे मुख्य भूमिकेत प्रेक्षकांसाठी नवीन असणार आहे.
“Dhadak 2” ह्या सिनेम्याची कथा हि लव्ह स्टोरी असून सिनेमा हा जातीय तेढ ह्यावर आधारित आहे. सिनेम्यातील दोन प्रेमी दाखवले असून अभिनेत्री हि उच्च जातीची असून अभिनेता हा दलित जातीचा दाखवला आहे. भारत हा जातीय व्यवस्था असलेला देश आहे. जातीची एक उतरंड भारतीय ग्रामीण तसेच पारंपरिक शहरात हि दिसते अश्या ह्या जातीय व्यवस्थेला न जुमानता दोन प्रेमी एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात तेव्हा तथाकथित समाज अश्या प्रेम्यानं काय त्रास देतो हे सांगण्याची गरज नाही. अशाच प्रकारची लव्ह स्टोरी सिनेम्यात बघायला मिळेल. धडक ह्या सिनेम्याची कथा हि काहीशी तशीच होती. 2018 साली आलेला हा सिनेमा सैराट ह्या मराठी सिनेम्याचा रिमेक होता. जान्हवी कपूर व इशांत खत्तरच ह्या सिनेम्यामुळे बॉलिवूड मध्ये पर्दापण झालं होत. धडक 2 ह्या सिनेमा पेरूएरम पेरुमल ह्या तामिळ सिनेम्याचा रिमेक आहे असं माहितीवरून कळलं आहे. सिनेम्याच्या टिझर वरून सिनेम्याच्या बाकीच्या कास्ट बद्दल काही कळू शकलं नाही तसेच सिनेम्याच्या रिलीज बद्दल हि माहिती टिझर मध्ये दिली नसून लवकरच सिनेम्याचे अपडेट समोर येतील.

 

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.