Kartik aryan मागचे बरेच दिवस “Chandu champiyan” ह्या सिनेम्याचे अपडेट देत होता. कधी शूटिंग चे फोटो सोशियल मीडिया वर शेअर करायचा तर कधी सिनेम्याच्या डब्बीन्ग चे फोटो टाकायचा. फायनली कार्तिक आर्यनने ह्या सिनेम्याचे पोस्टर शेअर केले आहे. कार्तिकने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर ह्या सिनेम्याच्या फायनल पोस्टर शेअर करत कॅप्शन मध्ये लिहलं आहे. “चंदू चॅम्पियन आ राहा है, मै बहोत एक्ससाईड हू, और बहोत गर्व महसूस कर रहा हू कि मेरे जीवन कि एक खास फिल्म आने वाली है. चंदू चॅम्पियन ह्या सिनेम्याच्या पोस्टर मध्ये कार्तिक आर्यन धावण्याच्या शर्यतीत धावत आहे. त्याचे पूर्ण शरीर हे मातीने भरलेलं आहे. व त्याने फक्त अंगावर लंगोट परिधान केले आहे. खूप रोमांचक असं हे पोस्टर असून कार्तिक ने पोस्टर शेअर केल्यापासून लगेच ह्याची चर्चा सुरु झाली आहे. कार्तिक आर्यन व चंदू चॅम्पियन ह्या सिनेम्याचे दिग्दर्शक Kabir khan बऱ्याच दिवसापासून सिनेम्याच्या शूटिंग मध्ये व्यस्त होते. चंदू चॅम्पियन ह्या सिनेम्याची कबीर बरेच दिवस आधी आऊंसमेंट केली होती. कबीर ह्यावर सतत काम करत होता. वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या लोकेशनवर शूटिंग पूर्ण झाल्यावर ह्या सिनेम्याची शूटिंग अंतिमतः पूर्ण झाली आहे. त्याचे अपडेट कार्तिक आर्यनने आपल्या सोशियल मीडियावर अकाउंट वर दिल आहे. त्यात त्याने लिहल आहे. कि फायनली चंदू चॅम्पियन ची शूट कंप्लिट झालं. त्या निम्मिताने कबीर खान ने स्वतः कार्तिक आर्यनला रसमलाई खाऊ घातली. कार्तिक आर्यन ह्यावर लिहतो कि मी पूर्ण एक वर्षाने साखर टेस्ट करत आहे. त्याने ह्या सिनेम्यासाठी खूप शारीरिक मेहनत घेतली आहे. ह्या सिनेम्यासाठी कार्तिकने भरपूर वजन कमी केलं असून त्या साठी त्याने कसून जिम केली आहे. कार्तिक ह्या सिनेम्यात भारतातील पहिले पॅराऑलम्पिक गोल्डमेडलिस्ट Murlikanat pedanekar ह्यांच्या भूमिका करणार आहे. मुरलीकांत पेडणेकर हे भारतातील पहिले पॅराऑलम्पिक मधील सुवर्ण विजेते. पेडणेकर ह्यांनी 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅराऑलम्पिक मध्ये फ्री स्टाईल जलतरणात सुवर्णपदक जिंकलं होत. मुरलिकांत हे मूळचे सांगलीच्या इस्लामपूरचे, ते भारतीय सैन्यदलात नोकरीला होते. 1965 च्या युद्धात त्यांना 9 गोळ्या लागल्या व त्यात त्यांचे दोन्ही पाय गेले. अपंगत्व आलेल्या मुरलीकांत ह्यांनी पुढे स्विमिंग सुरु केली. नंतर ते ह्या खेळात एवढे तरबेज झाले कि त्यांनी भारताला थेट ऑलम्पिक पर्यंत पोहचवले. अशी चॅलेंजिंग भूमिका कार्तिक पाहिल्यांदाच करत आहे. त्याला ह्या सिनेम्यासाठी शारीरिक फिटनेस करावी लागली तसेच खूप शिस्तीचे डाएट फॉलो करावे लागले आहे. ह्या सिनेमा एका अथेलीट ची कहाणी असून वेगवेगळ्या देशामध्ये ग्रॉऊंवर ह्या सिनेम्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे. कबीर खान ने बॉलिवूड ला ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहे. बजरंगी भाईजान हा त्याचा सर्वात हिट सिनेमा. मात्र त्याचा मागचा सिनेमा 83 हा सिनेमा काही खास करू शकला नाही. रणवीर सिंग स्टारर ह्या सिनेमा रिलीज झाल्यावर पाहिजे तसा हिट झाला नाव्होता त्यामुळे कबीर पुन्हा बॉक्सऑफिस व धमाल करण्यासाठी सज्ज आहे. हा सिनेमा साजिद नाडियावाला प्रोड्युस करणार आहे. 14 जून ला हा सिनेमा सिनेमागृहत प्रदर्शित होणार आहे.

 

फिल्मीदुनियेविषयी अशीच नवनवीन माहित जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.