हल्ली AI हे नाव सर्वी कडे ऐकायला मिळते. ai म्हणजे आर्टिफिशयल इंटेलिजेंट. हे तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात सध्या धुमाकूळ घालत आहे. ai चा वापर करून मानवाचं बरंच काम सोपं होत. त्यामुळे प्रेत्येक क्षेत्रात हे ai ठाण मांडून बसलं आहे. ai चा परिणाम मनोरंजन क्षेत्रातही बघायला मिळतो. याधी ai हे सामान्य लोकांनी वापरायला सुरवात केली. मनोरंजन क्षेत्रात ai वापर आधी छोटे रिल्स बनवायला होऊ लागला. नंतर बऱ्याच वेळा लोक सेलिब्रिटींचा चेहरा वापरून रिल्स बनवणे, एखाद्या मोठ्या नेत्याला एकाद्या फेमस सिंगराचा आवाज देणे किंवा मोठ्या सेलिब्रिटींचा आवाजात एखाद गाणं तयार करण अशे छोट्या पद्धतीने ai वापर काही चांगल्या गोष्टी साठी तर काही वाईट गोष्टी साठी मनोरंजन क्षेत्रात होऊ लागला आहे. काही वेळा अमिताभ बच्चन ह्या सारख्या दिग्गज कलाकाराला ai च्या वापरावर चिंता व्यक्त करावी लागली आहे. मात्र AIचा चांगला वापर हि होऊ शकतो. मागे एका मुलाखतीत मराठीतील अभिनेते व दिगदर्शक Mahesh kothare ह्यांनी त्यांच्या आगामी सिनेमा “Zapatalela 3” ह्याची अनौसमेन्ट केली. ह्यामध्ये एक विशेष गोष्ट अशी कि त्यांनी ह्या सोबत लक्ष्या ला म्हणजे Laxikant berde ह्याला पुन्हा मोठ्या परद्यावर आणण्याची घोषणा केली आहे. ai चा वापर करून ते पुन्हा लक्ष्मीकांत बेर्डे ह्याला प्रेक्षकांना खळखळून हसवायला आणणार आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे हे मराठीतील एक यशस्वी समीकरण होत. महेश कोठारे दिग्दर्शित त्या काळातील सर्व सिनेम्यात लक्ष्या हे त्याच्या सिनेम्यातील एक लक्ष्यवेधी पात्र असायचं. त्या काळात महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत ह्या जेवढे सिनेमे केले तेवढे तुफान गाजले. हे सिनेमे नुसते गाजले नाही तर ह्या सिनेम्यांना लोकांनी पुन्हा पुन्हा बघणे पसंद केले. ह्या सिनेम्यांनी क्रेज आताही बघायला मिळते. जेव्हा जेव्हा हे सिनेमे आता टेलिव्हिजन वर येतात, आताही ह्या कलाकृतींची क्रेज कमी झाली नाही. त्यामुळे महेश ह्याच दिग्दर्शन व लक्ष्मीकांत ह्यांचा अभिनय किती मजबूत असेल ह्याचा अंदाज येतो. लक्ष्मीकांत ह्याच विनोदी पात्र ह्याला मराठीत तोड नव्हती. त्यांनी फक्त महेश कोठारे नाही तर अशोक सराफ, सचिन पिळगावकर अश्या सर्व त्या काळातील मोठ्या अभिनेत्या सोबत काम करून सिनेमे गाजवले. लक्ष्या ची अभिनयाची एक स्पेशियल शैली होती, त्याच्या कडे विनोदाचा अचूक टायमिंग होता. त्यामुळे ai लक्ष्याचा चेहरा पुन्हा प्रेक्षकांसमोर आणू शकते परंतु त्याच्या अभिनयातील बारीक विनोदी लकबी व त्याच अचूक विनोदी टायमिंग आणू शकेल का हे बघायला उत्सुकता लागली आहे. सध्या क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित आज्जी बाई जोरात हे बालनाट्य खूप गाजत आहे. ह्या बालनाटकात लक्ष्मीकांत ह्याचा आवाज ai च्या साहाय्याने पुन्हा रिक्रिएट केला आहे. ह्या नाटकात लक्ष्मीकांत ह्यांचा मुलगा अभिनय बेर्डे हि मुख्य भूमिकेत आहे. ह्या बालनाट्याला पाहिलं ai बालनाट्य असा नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे लक्ष्याची पहिली झलक प्रेक्षकांना ह्या नाटकातून अनुभवली आहे. महेश ह्याचा झपाटलेला हा सिनेमा १९९३ साली आला. हा सिनेमा तेव्हा तुफान गाजला. ह्या गाजलेल्या सिनेम्याचा दुसरा भाग महेश ह्यांनी त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे ह्याला घेऊन केला. झपाटलेले २ हा हि सिनेमा चांगला हिट झाला. त्यामुले आता लक्ष्या च्या पुरागमनाची बातमी ऐकून प्रेक्षकांना झपाटलेला ३ ह्या सिनेम्याची ओढ लागली आहे.
फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.