“सिकंदर” ह्या सिनेम्याचं शूट आहे सुरु, सिनेम्याचं म्युझिक असणार खास.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या लेखात

  •     सलमान च्या सिकंदर ह्या सिनेम्याचं वेगवेगळ्या ठिकाणी शूटचे फोटो आले समोर.
  •    सिकंदर मधून सलमान करणार कमबॅक.

सलमान च्या सिकंदर ह्या सिनेम्याचं वेगवेगळ्या ठिकाणी शूटचे फोटो आले समोर.

Salman khan सध्या त्याच्या Sikandar ह्या सिनेम्याच्या शूट मध्ये बिझी आहे. सलमान ह्याच्या आगामी सिनेमा सिकंदर ह्याच्या शूटिंग चे वेगवेगळ्या लोकेशन वरील फोटो सध्या समोर आले असून सिनेम्याच्या एकूणच कामात वेग आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार सिनेम्याचं 50 टक्के शूट संपलं असून सिनेम्याच्या पुढची शूटिंग सुरु आहे. सिनेम्याच्या खास मिळालेल्या माहिती नुसार ह्या सिनेम्यातील दोन चार्टबस्टर गाण्याचं शूट झालं असून हे दोन्ही गाण्यावर पूर्ण सेट चांगलाच थिरकाला आहे. सलमान ह्यानेच ह्याची माहिती दिली असून सलमान ह्याला हे दोन्ही डान्स सॉंग खूप पसंत आले आहे. सलमान ह्याने सांगितले आहे कि हे प्रीतम च्या जीवनातील सर्वात चांगले सॉंग ठरू शकतात. सिकंदर ह्या सिनेम्याला बॉलिवूड मधील पॉप्युलर कंपोजर प्रीतम ह्याच संगीत लाभलं असून त्याच्या म्युझिक स्टाईल ची स्वतः सलमान ह्याने स्तुती केली आहे. हे दोन्ही गाणे हे डान्स सॉन्ग असून एका गाण्याला होली बॅकग्राउंड व एका गाण्याला ईद बॅकग्राउंड ने शूट केलं आहे. सिनेम्याचे एकूण म्युझिक चांगलं असणार असून सलमान व रश्मीका ह्यांची केमिस्ट्री ह्या गाण्यावर बघायला मिळणार आहे. सलमान ह्याच्या अनेक सिनेम्यामध्ये सलमान म्युझिक वर खास लक्ष देत असतो, त्यामुळे सलमान ला सिकंदरच्या म्युझिक कडून खास अपेक्षा आहे. सलमान ह्याला आलेल्या दोन्ही गाण्याला प्रेक्षक खूप पसंत करतील अशी आशा आहे. सलमान ह्याच्या सिकंदर ह्या सिनेम्यात सलमान सोबत ह्या सिनेम्यात Rashmika Mandana हि स्क्रिन शेयर करणार असून मुरगुदास ह्या सिनेम्याचं डायरेक्शन करणारा आहे.

सिकंदर मधून सलमान करणार कमबॅक.

सलमान खान ह्याचे मागचे सिनेमे हे बॉक्सऑफिस वर काही खास कमाल करू शकले नाही. त्याचा किसी का भाई किसी कि जान हा सिनेमा ऍव्हरेज ठरला होता. अजून मागे आलेल्या अनेक सिनेमे सलमान ह्याच्या साठी ऍवरेज ठरले आहे. सलमान ह्याला परत कमबॅक करण्यासाठी एका मोठ्या सिनेम्याची गरज आहे. त्याला त्याच्या सिकंदर कडून नक्कीच चांगली आशा आहे. सिकंदर हा सिनेमा साऊथ डायरेक्टर Muragadas हा डायरेक्ट करणार आहे. मुरगुदास ने अनेक हिट सिनेमे डायरेक्ट केले आहे. त्यामुळे सलमान ह्याच्या सिकंदर हा हिट सिनेमा ठरू शकतो. ह्या सिनेम्याला साजिद नाडियावाला डायरेक्ट करत असून सलमान, साजिद व मुरगुदास ह्या त्रयी ने सिनेमा नक्कीच चांगला बनणार. सिनेमा ऍक्शन पट असून सिनेम्यात साऊथ सुपरस्टार रश्मीका मंदाना असणार आहे. रश्मीका हिचे एका लाईनमध्ये सिनेमे येण्यासाठी तयार आहे. तिचा पुष्पा 2 हा सिनेमा 6 डिसेंबर ला येणार असून ती विकी कौशल स्टारर छावा ह्या सिनेम्यातही दिसणार आहे. सलमान मात्र फक्त सिकंदर ह्या सिनेम्याला वेळ देत असून सिकंदर हा कल्ट मूवी ठरू शकतो.

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.

 

Leave a Comment