मागच्या वर्षी आलेल्या Gadar 2 ह्या सिनेम्याने बॉलिवूड सुपर स्टार सनी देओल Sunny deol ह्याचे जबरदस्त कमबॅक केलं आहे. 2023 साली रिलीज झालेल्या ह्या सिनेम्याने जवळ जवळ 700 कोटी एवढ़ी वल्डवाईड कमाई केली होती. या आधी सनी देओल ह्याचे अनेक सिनेमे फ्लॉफ झाले होते,व बऱ्याच काळापासून सानी देओल हिट सिनेमा देण्यासाठी उतावीळ होता. गदर २ ह्या सिनेम्यानंतर सनी देओल ह्याच्या कडे अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या असून सनी ने त्याच्या काही आगामी सिनेमांचे शूट हि सुरु केले आहे.Lahor 1947 ह्या Rajkumar santoshi दिग्दर्शित सिनेम्याचे काम सध्या सुरु आहे. ह्या सिनेम्याला Amir khan प्रोड्युस करणार आहे व सनी ह्या सिनेम्यात मुख्य भूमिकेत असणार आहे. व दुसरीकडे सनी देओल ह्याने त्याच्या अजून एका नवीन सिनेम्याचे अपडेट दिले आहे. SDGM असं त्याच्या आगामी सिनेम्याचं नांव असून हा सिनेमा साऊथ दिग्दर्शक मुलचंद मलेलेंनी दिग्दर्शित करणार आहे.
SDGM असं सध्या ह्या सिनेम्याचं नाव समोर आलं असून ह्या सिनेम्याच्या मुहूर्त ला सनी देओल ह्याने हजेरी लावली होती. सोसिअल मीडिया वर ह्या सिनेम्याच्या उदघाटन प्रसंगाचे फोटो समोर आले असून सनी ने त्याच्या ट्विटर अकॉउंट वर ह्याची माहिती दिली आहे. सनी ने लिहलं आहे, देशातील सर्वात मोठी ऍक्शन फिल्म. Sunni deol “SDGM” च्या निम्मिताने पहिल्यादांच साऊथ इंडस्ट्रीसोबत काम करणार आहे. सनी देओल सोबत ह्या सिनेम्यात सयामी खेर हि मुख्य भूमिकेत असून तिनेही सिनेम्याच्या मुहूर्ताला हजेरी लावली होती. मुलचंद मलेलेंनी हे तेलगू इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. त्याने रवी तेजा सोबत बालपु, क्रॅक, डॉन सिनु अशे हिट सिनेमे दिले आहेत. त्यातील क्रॅक ह्या तेलगू सिनेम्याचा “SDGM” हा हिंदी मध्ये रिमेक बनणार आहे अशी अफवा होती मात्र स्वतः मुलचंद मेलेलेंनी ह्याने ह्या बातमीला अफवा असल्याचे सांगितलं असून लवकरच सिनेम्याचे कथे बद्दल व त्याच्या इतर स्टार कास्ट बद्दल सांगितलं जाईल असे त्याने सांगितलं. सिनेमा हिंदी मध्ये बनून इतर भाषेत डब होऊन पॅन इंडिया रिलीज होणार आहे कि फक्त तेलगू मध्ये येणार आहे हे सर्व गुपित ठेवलं आहे. टॉलिवूड मधील मुख्य प्रोडक्शन हाऊस मैत्री मूवी मेकर्स आणि पीपल मीडिया फैक्ट्री ह्यांच्या संयुक्त विद्यामानेने निर्मितीची जबाबदारी घेतली असून थमन एस हा सिनेम्याला संगीत देणार आहे. ऋषी पंजाबी सिनेम्याची सिनेमॅटोग्राफी करणार आहे.
फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.