बॉलिवूड ऐक्ट्रेस  JANHAVI KAPUR तिच्या ऍक्टिंग करिअर सोबत वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून बघत आहे. धडक ह्या सिनेम्यातून बॉलिवूड मध्ये एंट्री करणाऱ्या जान्हवी कपूर ने तिच्या अभिनय करिअर च्या सुरवातीच्या काळातच वेगवेगळे विषय असलेले सिनेम्याचे आव्हान स्वीकारले आहे. धडक सारख्या रोमँटिक लव्हस्टोरी असलेल्या सिनेम्यानंतर तिने, गुंजन सक्सेना ह्या सिनेम्यात तिने भारतीय एअर फोर्स च्या पायलट ची भूमिका केली. तर दुसरीकडे तिने कॉमेडी होणार कॉमेडी थ्रिलर रुही ह्या सिनेम्यामध्ये काम केलं. गुड लूक जेरी सारख्या स्मगलर क्राईम असो वा राजकुमार राव सोबत नवीन येणार खेळा संबंधित mr and mrs mahi असो ह्या तिच्या सर्व भूमिका वेगवेगळ्या आहे. आता तिचा आगामी सिनेमा “ULAJH” चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यात जान्हवी एका IFS ऑफिसर च्या भूमिकेत दिसणार आहे. सुधांशु सराई दिग्दर्शित उलझ हा सिनेमा ५ जुलै ला प्रदर्शित होणार आहे. ULAJH मध्ये JANHAVI KAPUR सोबत मियाँग चांग, रोशन मॅथ्यू, गुलशन देवांह, राजेंद्र गुप्ता, सचिन खेडेकर, आदिल हुसेन, राजेश तैलंग, जितेंद्र जोशी हि स्टार कास्ट बघायला मिळणार आहे. उलझ हा सिनेमा भारतीय विदेश सेवा म्हणजेच इंडियन फॉरेन सर्व्हिस च्या दुनियेशी संबधीत आहे. जान्हवी कपूर हि एका इंडियन फॉरेन ऑफिसर च्या भूमिकेत आहे. त्यात ती सुहाना नावाचं पात्र साकारणार आहे. ट्रेलर मध्ये तिच्यावर देशविरोधी आरोप लागल्याचे दिसत आहे. ती स्वतःची देशभक्ती सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे प्रयन्त करताना दिसत आहे. इंडियन फॉरेन सर्व्हिस सारख्या गुप्त सेवांबद्दल लोकांना जास्त माहिती नसते. देशाच्या सुरक्षा व विदेशी संबंधाला एक विशेष महत्व असते अशा माहिती व संबंधाला सामान्य पर्यन्त पोहचू दिल जात नाही. हा सिनेमा अशा संबंधाशी निगडित असून विदेशी संबंध व त्या दुनियेशी कनेक्ट करेल. जान्हवी कपूर त्यात एका इमानदार ऑफिसर च्या भूमिकेत दिसणार असून सिनेम्यामध्ये काही विदेशी संबंध व तणावाशी निगडित किस्सा आहे. ह्या अगोदर भारतीय गुप्तचर संस्था (RAW )ह्याच्या धर्तीवर अनेक सिनेमे आहे. मात्र भारतीय विदेश सेवा सारख्या एका विशेष विषयावर अजून जास्त सिनेमे बघायला मिळाले नाही. जान्हवीच्या उलझ मध्ये विशेष दर्शन बघायला मिळेल. मागील वर्षांपासून जान्हवीचे एकामागून एका सिनेमे येत आहे. उलझ अगोदर तिचा mr and mrs mahi हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मागच्या वर्षी ती बवाल, मिली ह्या सिनेम्यामध्ये झळकली होती. तर देवरा हा जुनियर एन ती आर च्या सिनेम्याध्ये हि ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. JANHAVI KAPURने सध्या सिनेम्याचा एकामागून एक झपाटा लावला आहे. मात्र ती तिच्या पहिल्या ब्लॉकबस्टर च्या शोधात आहे.