मराठीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक SUDHIR FADAKE हे महाराष्ट्रातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व. गायक, संगीत दिग्दर्शक अशी मोठी कारकीर्द गाजवलेल्या सुधीर फडके उर्फ बाबूजी ह्यांचा जीवनप्रवास हि एक विलक्षण गोष्ट आहे. मराठी व हिंदी संगीतक्ष्रेत्रात अविलक्षण यश संपादन करणाऱ्या ह्या संगीत दिग्दर्शकाचा जीवनप्रवास वाटतो तेवढा सरळ नव्हता. त्यांनी अनेक अडचणींवर मत करून हा टप्पा गाठला होता. ह्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या यशामागील प्रवास सिनेम्याच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन येत आहे, योगेश देशपांडे. योगेश देशपांडे दिग्दर्शित स्वरसम्राट सुधीर फडके हा सिनेमा 1 मे ह्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी येणार आहे. हा सिनेमा सुप्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक सुधीर फडके ह्यांचा बीओपीक असून सुनील बर्वे हे सुधीर फडके ह्यांच्या भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे. त्याच बरोबर सुधीर फडके ह्यांच्या पत्नी ललिताबाई फडके ह्यांच्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे दिसणार आहे. त्या वेळेस संगीत दिग्दर्शक सुधीर फडके ह्यांच्या आजूबाजूला अनेक दिग्गज कलाकार होते. त्यामुळे त्यांच्या जीवनप्रवासात अनेक दिग्गज कलाकारांची भूमिका आहे. सागर तळशीकरांनी ग दि माडगूळकरांची भूमिका केली आहे. सुधीर फडके ह्यांच पूर्ण आयुष्य संगीत साधनेमध्ये गेलं. लहानपणापासून त्यांना संगीताची आवड होती. त्यामुळे त्यांनी लहानपणीच शाश्रीय संगीताचे धडे घेतले व आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईची धाव घेतली. मात्र मुंबईसारख्या स्वप्ननगरीमध्ये आल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना अनेक कष्ट घ्यावे लागले. हे त्याचं यश मिळवण्याच्या अगोदरच स्ट्रगल व वयक्तिक आयुष्य आपल्याला सिनेम्याच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. त्यांना हळू हळू यश मिळाल्यानंतर त्यांनी नंतर अनेक दिग्गज गायकांकडून गाणी गाऊन घेतली,त्यात लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार ह्या सारख्या दिग्गजांचा समावेश होतो. हे सर्व सिनेम्याचा भाग असणार आहे. हा संगीत सिनेमा असल्यामुळे ह्या सिनेम्यात सुधीर फडके ह्यांच्या ओरिजनल आवाजात 27 गाणी ऐकायला मिळणार आहे. एवढी गाणी असणारा हा पहिला सिनेमा आहे. सुधीर फडक्यांनी ग दि माडगूळकरांचं गीत रामायण हा काव्य संग्रालय सर्व रेकॉर्ड करून घेतला. त्यांनी त्यात एकूण 57 गाणी रेकॉर्ड केले व घराघरापर्यंत गीत रामायण पोहचवल. ह्यातून त्यांची व ग दि माडगूळकरांची चांगलीच घट्ट मैत्री जमली. त्यामुळे सुधीर फडके ह्यांच्या साठी गदिमा नी अनके गाणी समोर लिहली. हे सर्व सिनेम्यातून दाखवण्याचा प्रयत्न योगेश देशपांडे यांनी केला आहे. सुनील बर्वे ह्यांनी सुधीर फडक्याची भूमिका अगदी नैसर्गिकरित्या निभावली आहे. त्यांचं पूर्ण दिसणं हे सुनील बर्वे ह्यांच्या मध्ये उतरलं आहे. तर मृण्मयी हिनेही लताबाईंची भूमिका अगदी सहज अंगिकारली आहे. हा सिनेमा एक पिरॅडिक सिनेमा असल्यामुळे 1980 चा काळ व त्याकाळातील कलाकार समोर परत सिनेम्यातून समोर उभे राहणार आहे. 1 मे ह्या दिवशी हा सिनेमा पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.