Prabhas चा आगामी सिनेमा “Kalki 2898 AD” ह्या सिनेम्याची सगळी कडे जोरदार चर्चा सुरु आहे. कारण अश्या प्रकारचे सायन्स फिक्शन सिनेमे 4 ते 5 वर्षांनी बॉलिवूड मध्ये बनतात.. हॉलिवूड मध्ये दर 3 महिन्यांनी रिलीज होणाऱ्या अश्या सायन्स फिक्शन सिनेमे मात्र इंडिया मध्ये फार कमी बघायला मिळाला. याआधी बॉलिवूड ने अशे ऍक्शन सायन्स फिक्शन सिनेम्यांचा प्रयोग अनेकदा केला आहे. शाहरुखचा रा.वण, राकेश रोशन ह्याचा क्रिश ३ व रजनीकांत स्टारर रोबोट व रोबोट 2 अशे हे सायन्स फिक्शन सिनेमे भारतीय ऑडियन्स ने अनुभवले आहे. ह्यातील रा.वन हा सिनेमा फ्लॉफ झाला होता, तर क्रिश व रोबोट ह्या दोन्ही सिनेम्यांनी तगडी कमाई केली होती ह्यावरून अशा प्रकारच्या सिनेम्यांना भारतीय ऑडियन्स भरभरून प्रतिसाद देते हे नक्की आहे, मात्र सिनेमा तश्या प्रकारचा हवा. अश्या सायन्स फिक्शन सिनेम्याचा बजेट खूप असतो कारण सिनेम्यात भारी vfx व आधुनिक टेक्नोलोंजि चा वापर करून मोठं मोठे सिन दाखवण्यात येतात अश्या सिनेम्याचा मेकिंकचा खूप मोठा खर्च असतो. हॉलिवूड मध्ये तश्या प्रकारे टेक्नोलोंजि डेव्हलप झाली आहे त्यामुळे तिकडे सहज तश्या प्रकारचे टेक्निशियन व टेक्नोलोंजि उपलब्द होते मात्र इंडियामध्ये ह्याआधी मोठी किंमत मोजावी लागत असते बऱ्याचदा विदेशी टेक्निशियन ची मदत घ्यावी लागते त्यामुळे खर्चात वाढ होऊन सिनेम्याचं बजेट वाढते. व एवढे करून जर सिनेम्याची कथा व टेक्नोलोंजि लोकांना आवडली नाही तर सिनेमा फ्लॉफ होण्याची भीती असते त्यामुळे भारतामध्ये अश्या प्रकारचे सिनेमे येण्यास वेळ लागत असतो.
Naga ashwin ने ह्या सर्व गोष्टींना आव्हान करत इंडियन सिनेम्याचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. कल्की हा सिनेमा सायन्स फिक्शन सिनेमा असून भारतीय पौराणिक कथा व सायन्स ह्याची सरमिसळ ह्या सिनेम्यात बघायला मिळत आहे. सिनेमा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांची जशी अपेक्षा होती तश्याच प्रकारचा ट्रेलर आहे. नागा अश्विन ने ह्या सिनेमा बनवण्यासाठी जेवढा खर्च केला आहे, तसाच खर्च तो सिनेम्याच्या प्रमोशन साठीही करत आहे. त्याच्या सिनेम्याच्या कार्टून व्हर्जन च ऍमेझॉन प्राईम वर रिलीज असो वा सिनेम्यात खास प्रभास बुज्जी नावाच्या कार च मोठ्या शहरात इव्हेंट ठेऊन प्रमोशन असो अश्या सर्व बाबतीत नागा अश्विन सिनेम्यासाठी काहीही कस्सर सोडत नसून सिनेम्याचं एकदाच प्रमोशन न करता हळू हळू प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवत आहे. सिनेम्याची अजून एक विशेषतः कि सिनेम्यात मोठी स्टार कास्ट Prabhas सोबत ,Amitabha bacchan, Kamal hasn, Dipika padukon , Disha patani अशे मोठे नाव आहे. ह्या मोठ्या स्टार कास्ट नि नावाप्रमाणे फी चार्ज केली आहे. ह्या सिनेम्यात ऍक्शन करणाऱ्या दिशा पटानी हिने 2 करोड रुपये घेतले आहे. बॉलिवूड मधील बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन ह्यांचा मोठा रोल ह्या सिनेम्यात असून ते अश्वत्थामा ह्यांच्या भूमिकेत आहे. त्यांनी ह्या सिनेम्यासाठी 18 कोटी एवढे पैसे घेतले आहे. कमल ह्या सिनेम्यात मुख्य व्हिलन च्या भूमिकेत आहे. काली असे त्यांच्या पात्राचं नाव असून त्यांनी ह्या सिनेम्यासाठी 20 करोड इवढी फी घेतली आहे. दीपिका हिने ह्या सिनेम्यासाठी सुद्धा २० कोटी एवढी फी घेतली आहे. तर ह्या सिनेम्यात मुख्य भूमिका करणारा प्रभास ह्याने ह्या सिनेम्यासाठी तब्बल 150 कोटी एवढी फी घेतली आहे. एवढी फी घेतल्यानंतर प्रभास सगळ्यात जास्त फी घेणारा स्टार ठरला आहे. ह्या सिनेम्याचे ऍडव्हान्स बुकिंग चांगली झाली असून सिनेमा 27 जून ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या http://www.filmikida.com वेबसाईड ला भेट द्या.