Nagaraj manjule बनवणार नवी वेब सिरीज. “मटका किंग”

Nagaraj manjule हे मराठी फिल्म इंडस्ट्रीतील एक आगळं -वेगळं नाव. त्याच्या Sairat ह्या सिनेम्याने मराठी इंडस्ट्रीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. नागराज ची गोष्ट सांगण्याची एक विशेष शैली आहे. छोट्याश्या Fandry ह्या लव्ह स्टोरी पासून आपल्या करिअर ची सुरवात करणार नागराज, हळूच पने फॅन्ड्री मध्ये एकतर्फी प्रेमा बरोबर ग्रामीण भारतातील जातीय दर्शन व त्यांच्या जगण्याची भीषण गोष्ट सांगून जातो. सैराट मध्ये दोन जीवापाड प्रेम्याना त्याच्या मध्ये असलेल्या जातीय तफावती मुळे कसा जीव गमवावा लागतो हे नागराज ने दाखवले तर झुंड मध्ये मोठं मोठ्या विकसित मेट्रो सिटी तील झोपडपट्टीत मुलांमध्ये असलेल्या कौशल्याची गोष्ट नागराज सांगितली . नागराज च्या दिग्दर्शनामध्ये विविधता आहे , आता तो मुंबईतील मटका जुगारातील बेताब बादशाह रतन खत्री ह्याची गोष्ट वेब सिरीज मधून प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ह्या वेब सिरीज च लेखन नागराज मंजुळे ह्याने केलं असून स्वतः नागराज मंजुळे ह्या सिरीज ला दिग्दर्शित करणार आहे. रतन खत्री ह्याच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा हा असणार आहे. त्या सोबत ह्या वेब सिरीज मध्ये मराठीतील अभिनेता Siddharth jadhav, Sai tamhankar , gulshan grovar हि स्टार कास्ट असून हि वेब सिरीज सिद्धार्थ रॉय कपूर निर्मित करणार आहे.

काय आहे Ratan khatri ह्याची गोष्ट.
1960 च्या दशकात मटका हा जोरावर होता. मटका म्हणजे आकड्यांचा खेळ. मुंबईतील त्यावेळचे मिल मिल कामगार, हातगाळीवरील हमाल, छोटे छोटे दुकानदार व नोकरदार अश्या प्रत्येक वर्गातील जनतेला मटक्याचं वेसण लागल होत. ह्या जनतेला मटक्याच वेसण लावणारा व्यक्ती व जुगारातील ह्या आकड्यांच्या खेळातील बेताब बादशाह म्हणजे रतन खत्री. रतन खत्री ह्याच्या बद्दल अनेक दंतकथा आहे. रतन खत्री ह्याचा जन्म 1932 मध्ये पाकिस्तान मध्ये झाला. फाळणीच्या वेळी तो भारतात आला. तो सुरवातीच्या काळात उल्हास नगरमध्ये राहत होता, नंतर तो मुंबईमध्ये आला. 60 च्या दशकात न्यूयॉर्क कॉटन ड्रेडिंग नावाचा एक जुगार चालायचा , त्याचे काही आकडे इंग्रजी पेपरमध्ये यायचे. 1961 मध्ये ते बंद पडले व त्यानंतर कल्याणजी ने वरळी मटका सुरु केला. त्या कल्याणजीचा रतन खत्री हा मॅनेजर होता. नंतर कल्याण मटक्यातून बाहेर पडून त्याने 1964 मध्ये त्याने तीन पत्ती मटका सुरु केला. तो इतका फोफावला कि साधारण 2000 पर्यंत रतन खत्री ह्याने मुंबईच्या जुगारातील दुनियावर राज्य केलं. रतन खत्री ह्याच्या जीवना बद्दल व त्याच्या राहणीमान व संपत्ती बद्दल अनेक अफवा व दंतकथा आहे. अश्या ह्या असामान्य व्यक्तिमत्त्वाकडे नेहमीच नकारात्मक दृष्टिकोनातून बघितल जायचं मात्र आता ह्या विवादित प्रसिद्ध पात्रावर नागराज वेब सिरीज बनवणार आहे.

Vijay varma करणार रतन खत्री ह्याची भूमिका.
विजय वर्मा सध्या बॉलिवूड मध्ये त्याच्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. विजय हा अभिनयातील मुख्य अभिनेता व चार्मिंग हिरो जरी नसला मात्र त्याच्या कॅरेक्टर ऍक्टिंग ला बॉलिवूड मध्ये तोड नाही. अनेक मोठ्या सिनेम्यात साईड कॅरेक्टर करण्यासाठी तो दिग्दर्शकांची पहिली पसंती असतो. त्याने गल्ली बॉय, दहाड, लष्ट स्टोरी ह्या वेब सिरीज व सिनेम्यांमधून आपल्या अभिनयावरील पकड दाखवून दिली आहे. त्यामुळे एकाद्या खऱ्या जीवनातील पात्राची बीओपीक करताना अनेकदा विजय हा पहिली पसंती असू शकतो. वेब सिरीज हि विजय ला नवी नाही. त्याने सिनेम्या बरोबर बऱ्याच वेब सिरीज मध्ये काम केलं आहे, मात्र नागराज ह्याला वेबसीरीज हा पहिलाच अनुभव असणार आहे.

फिल्मी दुनियेविषही अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.