मागचे बरेच दिवस Kangana ranawat तिच्या “Emergency” सिनेम्यात व्यस्त होती. तिने ह्या सिनेम्यासाठी कसून मेहनत घेतली आहे. हा सिनेम्याच्या रिलीज डेट अनेक वेळा समोर आल्या मात्र प्रत्येक वेळी काही ना काही कारणावरून हा सिनेमा समोर ढकलण्यात आला होता. अनेक वेळा कंगना ला ह्या सिनेम्याबद्दल विचारल्यावर हा सिनेमा पूर्ण झाला असून पोस्ट प्रोडक्शन च काम सुरु आहे अस सांगितलं होत. कंगनाने अनेक वेळा जेव्हा सिनेमा शूट होत होता तेव्हा ह्या सिनेम्याच्या शुटिंगचे फोटो सोशियल मीडियावर शेअर केले होते, त्यामध्ये कंगना अनेक वेळा सिनेम्याच्या गेटअप मध्ये आढळली होती. “Emergency “हा सिनेमा कंगना साठी खूप महत्वाचा सिनेमा आहे कारण ह्या सिनेम्यासाठी तिने फक्त वेळ नाही तर पैसाही पणाला लावला आहे. म्हणजे ह्या सिनेम्यात ती फक्त मुख्य भूमिकेत नाही तर ती ह्या सिनेम्याची स्वतः दिग्दर्शक हि असून हा सिनेमा स्वतः तिनेच प्रोड्युस केला आहे. म्हणजे कंगना ह्या सिनेम्यात तिहेरी जाबाबदारी सांभाळत आहे. अनेक शूटिंग च्या फोटो मध्ये कंगना हि स्वतः गेटअप मध्ये असून सुद्धा कॅमेऱ्याच्या मागे दिग्दर्शनाची धुरा सांभाळताना दिसली होती. ह्या सिनेम्याची शूटिंग बरेच दिवस आधी पूर्ण झाली असून सिनेम्याच्या रिलीज डेट बद्दल कंगनाकडून माहिती समोर आली नाही. हा सिनेमा खूप आधी प्रदर्शित होणार होता. मात्र २०२४ भारतीय संसदीय सार्वत्रिक निवडणुकीमुळे ह्या सिनेम्याच्या रिलीज डेट समोर ढकलण्यात आली आहे. कंगना स्वतः ह्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून मंडी ह्या हिमाचल प्रदेश च्या जागेसाठी खासदारकी साठी उभी आहे त्यामुळे कंगनाने ह्या साठी जोरदार प्रचार केला होता. प्रचार सभा, रोड शो अश्या सर्व प्रकारची मेहनत कंगना घेत होती त्यामुळे तिला निवडणुकीच्या धामधुकीत Emergency ह्या सिनेम्याच्या रिलीज डेट तिला पुढे ढकलावी लागली. ह्या सिनेम्याचं टिझर मात्र कंगनाने प्रदर्शित केलं होत त्यामध्ये ह्या सिनेम्याची रिलीज डेट 14 जून अशी असून हा सिनेमा Kartik aryan ह्याच्या चंदू चॅम्पियन ह्या सिनेम्याशी क्लॅश करेल. दोन्ही मोठे सिनेमे असून एकमेकांच्या कलेक्शन वर परिणाम करतील. इमर्जन्सी ह्या सिनेम्यात कंगना हि भारताची माजी पंतप्रधान Indira ghandhi ह्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. इंदिरा गांधी ह्यांचं जीवन अनेक वादविवादित असून त्यांनी पंतप्रधान असताना अशे अनेक निर्णय घेतले ज्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली सोबतच त्यांच्यावर अश्या पोलिटिकल निर्णयामुळे टीकाही सहन करावी लागली. इंदिरा गांधी ह्यांच्या कार्यकाळात भारताने अनेक धाडशी निर्णय व धाडशी मोहिमा केल्या होत्या. काहींचा भारताला समोर फायदाही झाला तर काही निर्णयामुळे इंदिरा यांना अनेक टीका सहन कराव्या लागल्या. त्यांच्या जीवनातील असाच एक वादाचा निर्णय म्हणजे इमर्जन्सी 1975 मध्ये भारतात अनेक ठिकाणी अहिंसेचा वातावरण पेटलं होत. अनेक ठिकाणी काँग्रेस विरुद्ध आंदोलन, सभा, दगडफेक अश्या प्रकारचं काँग्रेस विरोधी वातावरण सर्व दूर पेटलं होत ह्यामुळे अश्या सर्व असंतोषाला हाताळण्यासाठी इंदिरा गांधी ह्यांनी 25 जून 1975 मध्ये इमर्जंसी जाहीर केली. ह्यामध्ये मानवाला असलेले सर्व मूलभूत अधिकार जप्त करण्यात आले. एकूण २ वर्ष चाललेय इमर्जंसी मध्ये अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेल मध्ये टाकण्यात आले. हा सर्व ऐतिहासिक काळ इमर्जन्सी मध्ये अनुभवायला मिळणार आहे. ह्यामध्ये कंगना सोबत ह्या सिनेम्यात अनुपम खेर, श्रेयश तळपदे, मिलिंद सोनम, सतीश कौशिक, महिमा चौधरी, भूमिका चावला हि स्टारकास्ट असणार आहे. कंगनाने ह्या सिनेम्यासाठी हुबेहूब इंदिरा ह्याचं पात्र साकारलं असून तिने इंदिरा ह्याचा आवाजही कॉपी केला आहे.

 

फिल्मी दुनियाविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.comला भेट द्या.