3 जून ला नेटफ्लिक्स व Sanjay lila bhansali ह्यांनी त्यांच्या Hiramandi ह्या त्यांच्या वेब सिरीज च्या दुसऱ्या सिझन ची घोषणा केली आहे. संजय लीला भन्साली ह्यांनी हिरामंडी च्या पुढच्या सीझनच्या कथेची माहिती देत म्हटले आहे. “विभाजनानंतर वेश्या लाहोर सोडून देतात व त्यातील बऱ्याच नाचणाऱ्या मुंबई व कोलकत्ता फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्थायिक होतात. मात्र त्यांचा संघर्ष सुरूच राहणार आहे. ह्या वेळेस त्यांना नवाबांकरिता नाही तर फिल्मी प्रोड्युसरांकरिता नाचावं लागणार आहे”. अशी काहीशी ह्या पुढच्या सिझनची स्टोरी असणार आहे. Hiramandi ह्याच पहिल सिझन रिलीज झाल्यानंतर लोकांनी ह्याला चांगला प्रतिसाद दिला होता. रिलीज च्या पहिल्या हफ्त्यात सिरीज ला लाख व्हू मिळाले होते. तर 6 मे ते 12 मे ह्या दरम्यान हा सगळ्यात जास्त बघितला गेलेला नॉन इंग्लिश शो बनला होता. हिरामंडी ला प्रेक्षाकांनी दिलेल्या चांगल्या प्रतिसादानंतर हिरामंडी ह्या सीझनचा दुसरा भागाकरिता संजय लीला भन्साली तयारी करत आहे. माहिती नुसार ह्या हिरामंडी च्या पहिल्या सिजनला जवळ जवळ 200 कोटी एवढा खर्च आला आहे.
इतिहासातील अविस्मरणीय कथा घेऊन त्यावर भव्य दिव्या सिनेमे बनवणारे व मोठ्या सिल्वर स्क्रिन वर आपले सिनेमे रिलीज करणारे                           Sanjay lila bhansali ह्यांनाही काळाच्या ओघात बदलावं लागलं, व आपलं हे अभ्यासपूर्व काम त्यांना नेटफ्लिक्स वर रिलीज करावं लागलं. हिरामंडी सोबत संजय लीला भन्साली ह्यांनी ott वर पदार्पण केलं. त्यांनी आपल्या हिरामंडी ह्या पहिल्या ott कामाला छोट्या स्क्रिन वर रिलीज करायचे आहे म्हणून आपल्या कामात अजिबात कस्सर सोडली नाही, त्यांनी तेवढ्याच जिद्दीने व मेहनतीने हिरामंडी हे सिझन बनवलं त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या इतर कामांप्रमाणे हिरामंडीला पसंती दर्शवली आहे.
Hiramandi  हि  कथा आहे इंग्रज काळात लाहोर मध्ये स्थित असलेल्या वेश्या वस्तीची. ह्या इतिहासकाळातील ह्या वस्तीत त्या काळातील मोठं मोठे नवाब आपलं मोनोरंज करण्याकरिता अश्या वेश्याजवळ जात असत. मोठे मोठे लोक, नवाब अश्या श्रीमंत लोकांचा वावर ह्या वस्ती मध्ये असल्यामुळे ह्या हिरामंडी ह्या वस्ती च नाव चांगलंच फेमस झालं होत, अश्या चाकाचौंद दुनियेतील काही मनाला भिडणाऱ्या कथा संजय लीला भन्साली ह्यांनी आपल्या हिरामंडी मध्ये घेतल्या आहे. सिजनच्या दुसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकरिता आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.