Duniyadari या सिनेम्या अगोदर Swapnil joshi, Sai tamhankar व Ankush chaudhari हे तिन्ही मराठीतील स्टार, अभिनय क्षेत्रात आप आपलं नशीब आजमावत होते, ते त्यांच्या त्यांच्या परीने ते काम करत होते मात्र त्यांचं नाव होईल असा सिनेमा त्यांच्या वाट्याला आला नव्हत. सई ताम्हणकर, अंकुश चौधरी व स्वप्नील जोशी हे पहिल्यांदा एकत्र आले ते दुनियादारी या सिनेम्यानिमित्त. ह्या सिनेम्या अगोदर ह्या तिन्ही मराठीतील स्टार ना पाहिजे तशी ओळख मराठी इंडस्ट्रीमध्ये मिळाली नव्हती. मात्र दुनियादारी च्या यशाने ह्यांना मराठीतील नवे स्टार अशी ओळख मिळाली व लोक त्यांना नावानिशी ओळखू लागले, कारण होत फक्त दुनियादारी. दुनियादारी हा सिनेमा 2013 मध्ये आला होता. Sanjay jadhav दिग्दर्शित हा सिनेमा संजय ह्याचाही जीवनातील दिग्दर्शक म्हणून सगळ्यात यशस्वी सिनेमा. संजय ह्यानेही ह्या अगोदर अनेक सिनेमे दिग्दर्शित केले होते मात्र मराठीतील उत्तम दिग्दर्शक अशा यादीमध्ये त्याच नाव सामाविस्ट झालं ते दुनियादारीमुळेच. ह्या मल्टीस्टार सिनेम्याची कथा होती अनेक मित्रांची व त्यांच्यामधील प्रेमाची. 2013 मध्ये आलेला हा सिनेमा आपल्याला भूतकाळात घेऊन जातो. जुनं पुण्याच्या एका नामांकित कॉलेज मध्ये हे सर्व मित्र भेटतात व तिथूनच सिनेम्याची कथा सुरु होते. सिनेम्यात मैत्री सोबत एक हार्ट टचिंग लव्ह स्टोरी बघायला मिळते. सिनेमा जसजसा पुढे जातो, तसतशी सिनेम्याची कथा वळण घेते व शेवटच्या टप्प्यात प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू सोडून जाते. सिनेम्यात अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर ह्या सोबत उर्मिला कोठारे, रिचा परियल्ली, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, वर्षा उसगावकर अशी मोठी स्टार होती . ह्या सिनेम्याचं म्युझिक हि खूप हिट झालं होत. टिक टिक वाजते डोक्यात, जिंदगी अशे ह्या सिनेम्यातील सर्व गाणे हिट झाले. ह्या सिनेम्याने त्या वेळेतील सर्व मराठी सिनेम्यांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन मोडत 32 कोटी एवढी कमाई केली. सर्व बाबतील हा सिनेमा हिट ठरला व त्यामुळे ह्या सर्व अभिनेत्यांच्या अभिनय करिअर ची गाडी सुसाट वेगाने धावू लागली. सई, अंकुश व स्वप्नील ह्यांनी नंतर अनेक हिट मराठी सिनेमे दिले व मराठी इंडस्ट्रीतील ते नवे स्टार झाले. संजय जाधव ह्याच्या दिग्दर्शनाखाली स्वप्नील व सई ने नंतर “प्यार वाली लव्ह स्टोरी” “तू हि रे” हे हिट सिनेमे केले तर अंकुश ने गुरु हा सिनेमा संजय च्या दिग्दर्शनाखाली केला. सई व अंकुश हे क्लासमेट ह्या सिनेम्यात एकत्र दिसले मात्र तिन्ही अभिनेते एकत्र येतील अशा योग 2013 नंतर आलाच नाही.
दुनियादारी ह्या सिनेम्याला आता तब्बल 11 वर्ष पूर्ण झाले असून मागे संजय जाधव ह्याने त्याच्या आगामी सिनेम्याची अनौसमेन्ट केली आहे. “Teri meri yari” अस ह्या सिनेम्याचं नाव असून ह्या सिनेम्यात Ankush chaudhari, Swapnil joshi,व Sai tamhankar पुन्हा दुनियादारी ह्या सिनेम्यानंतर तब्बल 11 वर्षांनी एकत्रित काम करणार आहे. संजय ने त्याच्या ह्या आगामी सिनेम्याची अनौसमेन्ट केली असून, प्रेक्षकांना हि बातमी कळल्यानंतर त्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. सिनेम्याच्या नावावरूनच सिनेमा मैत्री विषयी असणार ह्याची प्रेक्षकांना खात्री पटली असून दुनियादारी सारखाच हा सिनेमा हि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल का हे सिनेमा आल्यावरच कळेल.
फिल्मी दुनियाविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.