Amir khan ह्याचा “Sitare jamin par” ह्या सिनेम्याचं शूट कम्प्लिट झालं आहे. सिनेम्याची शूटिंग न्यू दिल्ली येथे वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण झाली असून सिनेम्याची गोष्ट त्याचा मागचा सिनेमा तारे जमीन पर ह्या सिनेम्याच्या थिम वर आधारित आहे. सिनेम्यात वेगवेगळ्या नऊ मुलांची गोष्ट दाखवणार असून त्यांना वेगवेगळ्या गोष्टींची समस्या दाखवण्यात आली आहे. सिनेम्यात मुख्य भूमिकेत Amir khan असून त्याच्या सोबत Jeneliya deshamukh असणार आहे.
  2007 साली आलेल्या आमिर खान ह्याचा सिनेमा तारे जमीन पर सिनेम्याला एकूण 16 वर्ष पूर्ण झाले आहे. सिनेम्यात ईशान नावाचं मुलाला dyslexic ह्या मानसिक आजाराने पीडित दाखवले होते. dyslexic असा आजार आहे कि ज्या मध्ये, मुलांना सारख्या दिसणारे अक्षर किंवा आकडे वाचण्यामध्ये खूप समस्या असते. लहान मुलांमध्ये सहसा शालेय वयात अश्या समस्यांना सामोरे जावे लागते, अश्या संवेदनशीन विषय असलेल्या तारे जमीन पर ह्या सिनेम्याला स्वतः आमिर खान ह्याने दिग्दर्शित केला होता. आमिर चा दिग्दर्शक असलेला पहिलाच सिनेमा. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपलं अभिनयात करियर सुरु केलेला आमिर ह्याचा तारे जमीन पार हा पहिलाच दिग्दर्शक म्हणून सिनेमा होता, दिग्दर्शकासोबत आमिर ह्याने ह्या सिनेम्यात अभिनय हि केला होता. कमी बजेट मध्ये बनलेल्या व एका सामाजिक समस्या वर आधारित ह्या सिनेम्याने चांगली कमाई केली होती ,सिनेमा हिट झाला होता व सिनेम्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. आता अश्याच थीम वर आधारित सितारे जमीन हा हि गोष्ट असणार असून सिनेम्यात वेगवेगळ्या नऊ मुलांची गोष्ट दाखवणार आहे. आमिर ने सांगितले आहे तारे जमीन पर हा सिनेमा इमोशनल सिनेमा होता तर सितारे जमीन पार हा सिनेमा थोडा कॉमेडी असणार आहे.
 Mr parfect ह्या नावानं ओळखला जाणारा Amir khan हा त्याच्या सिनेम्यात मनोरंजनासोबत सामाजिक मेसेज हि देत असो. त्याचा थ्री इडियट, दंगल किंवा तारे जमीन पर ह्या प्रेत्यक सिनेम्यात काही विशेष समाजातील विषयवार भाष्य करण्यात आले आहे. त्याच्या प्रोडक्शन होऊस द्वारे बनलेल्या lapata ledies हा, ह्या वर्षी आलेल्या सिनेमाही त्याचच उदाहरण आहे. सिनेम्याला प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळाली होती. lapata ledis हा नेटफ्लिक्स वर सगळ्यात जास्त बघितलेल्या सिनेमा बनला होता. आता अमीर अशीच मनाला भिडणारी गोष्ट सितारे जमीन पर ह्या सिनेम्यातून घेऊन येणार आहे. सिनेमा येत्या ख्रिसमस ला सिनेम्यागृहात येणार आहे.

फिल्मी दुनियाविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड  http://www.filmikida.com ला भेट द्या.