Viki kaushal चा मागे एक फोटो सोशिअल मीडिया वर वायरल झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार हा फोटो त्याच्या आगामी सिनेम्याचा आहे असे समजले आहे. त्याचा आगामी सिनेमा “Chava” ह्या सिनेम्यावर विकी सध्या कसून मेहनत घेत असून त्याच्या ह्या सिनेमाचा नवा लूक हि समोर आला आहे. त्यामध्ये तो लांब केस मोठी दाढी व कपाळावर चंद्रकोर, अंगामध्ये राजेमहारांचे वस्र हा त्याचा लुक त्याच्या फॅन्स ना त्याच्या विषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक करत आहे. छावा हा एक पिरॅडिक ऐतिहासिक सिनेमा आहे. त्यामध्ये विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करत आहे. व त्याच्या सोबत ह्या सिनेम्यात महाराणी येसूबाई ची भूमिका Rashmika mandana करणार आहे असे समजले आहे. त्या सोबत ह्या सिनेम्यात बाकी काही मराठी ऍक्टर ची नावे समोर आली आहे. “Chava” ह्या सिनेम्याला दिग्दर्शित करणार आहे Laxshman utekar. मागच्या वर्षी आलेला जरा हटके जरा बचके हा सिनेमा त्या सिनेम्यालाही लक्ष्मण उतेकर ह्यांनी दिग्दर्शित केला होता. विकी कौशल स्टारर जरा हटके जरा बचके ह्या सिनेम्याने मागच्या वर्षी चांगले बॉक्सऑफिस फिगर गोळा केले होते. त्याच्या सक्सेस नंतर लगेच लक्ष्मण उतेकर ह्या सिनेम्याच्या तयारीला लागले व विकीही ह्या मोठया पिरॅडिक सिनेम्यासाठी जोमाने तयारी करत असल्याचे समोर आले होते. छावा हा इतिहासातील मराठा साम्राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्यांचे पुत्र संभाजी महाराज ह्याची बीओग्राफी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मराठा साम्राज्याची धुरा संभाजी महाराजांनी सांभाळली होती. शिवाजी महाराजांसारखा त्यांच हि जीवन तेवढंच दैदिप्यमान आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं मात्र संभाजी महाराजांनी त्यांच पुढे राज्य वाढवण्याचे काम केलं होत. संभाजी महाराजांचं आयु जास्त नव्हतं. औरंगजेबच्या कैदेत सापडल्यानंतर लगेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या विषयी अनेक पुस्तके व साहित्य लिहलं गेलेलं आहे. त्याच्या आधार घेऊन लक्ष्मण उतेकर संभाजी महाराज ह्यांचं जीवन मोठ्या पडद्यावर उतारू शकतात. Viki kaushal ने ह्या मोठ्या ऐतिहासिक सिनेम्यासाठी विशेष ट्रेनिंग घेतली आहे. सिनेम्यामध्ये युद्धाचे सिन असल्यामुळे ह्या सिनेम्यासाठी विकीला शारीरिक मेहनत घ्यायची आहे. त्याला ह्यासाठी घोडसवारी, तलवारबाजी अश्या ट्रेनिंग घेताना समोर आले होते. त्याने ह्यासाठी विशेष लूक धारण केला आहे. त्याने ह्या पात्रासाठी बरेच दिवस झाले मोठी दाढी वाढवली आहे. संभाजी महाराज ह्यांच्या जीवनाविषयी इतिहासात अनेक संभ्रम आहे. वेगवेगळ्या इतिहासकारांनी त्याच्या विषयी वेगवेगळं लिहून ठेवलं आहे त्यामुळे लक्ष्मण उतेकर ह्यांच्या समोर मोठा टास्क असेल. लक्ष्मण उतेकर ह्यांनी बॉलिवूड मध्ये लुका छुपी, मिमी, जरा हटके जरा बचके ह्या सारखे सिनेमे दिग्दर्शित केले आहे. त्याचे आतापर्यंतचे सिनेमे हे फॅमिली ड्रामा सिनेमे होते. कमी बजेट व हलली फुलकी इंटरटेन्मेन्ट असे सिनेमे दिलेल्या लक्ष्मण उतेकर हे आता बिग बजेट ऐतिहासिक सिनेमा करणार आहे.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्याकरिता आमची वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.