दिग्दर्शक Nitesh tiwari ह्यांच्या “Ramayan” ह्या आगामी सिनेम्याबद्दल अनेक अपडेट समोर आल्या आहे. त्योसोबतच ह्या सिनेम्याबद्दल अनके अफवाही समोर येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ह्या सिनेम्याबद्दल नेमकं काय खर काय खोटं हे कळतच नाही आहे. रामायण हा बॉलिवूड मधील आगामी सिनेमा आहे. रामायण सारख्या मोठ्या धार्मिक ग्रंथावर हा सिनेमा असल्यामुळे ह्या सिनेम्याची जेव्हा नितेश तिवारी ह्यांनी अनाउन्समेंट केली तेव्हापासूणच ह्या सिनेम्याची जोरदार चर्चा रंगली होती. नितेश तिवारी ह्यांनी सांगितले हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे, व हा 3 भागामध्ये हा सिनेमा तयार होणार आहे. त्यानंतर त्यांनी ह्या सिनेम्याच्या कास्ट बद्दल सांगितले होते, Ranbir kapur ह्या सिनेम्यात भगवान श्रीराम ह्यांच्या भूमिकेत तर साऊथ एक्टरेस Sai pallavi हि सीता हिच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर रावणाच्या भूमिकेसाठी साऊथ ऍक्टर यश ला निवडण्यात आले आहे. रामायणाच्या इतर पात्रांबद्दल माहिती समोर अली नसून सिनेम्याच्या इतर पत्राबद्दल अनेक अफवा आहे, मात्र मेकर्स कडून तशी ऑफिशियली अनाउन्समेंट आली नाही. सिनेम्याबद्दल नितेश तिवारी ह्यांनी बरीच माहिती लपवली आहे. त्यांनी रामायणाची पवित्रता व गोपनीयता ह्याची भरपूर काळजी घेतली आहे, असे मानण्यात येत आहे. रणबीर कपूर ह्याच्या भगवान रामाच्या भूमिकेविषयी स्वतः त्याच्या कडून पुष्टी मिळाली आहे. त्याने त्याच्या एका इंटरव्हू मध्ये सांगितले होते कि तो नितेश तिवारी ह्यांच्या रामायण ह्या सिनेम्यात रामाची भूमिका करणार आहे. त्याने पुढे सांगितले कि भगवान रामाची भूमिका माझ्या वाट्याला आली हे माझे नशीबच आहे. हे पात्र साकारताना मोठी जबाबदारी माझ्यावर आली आहे. कारण माझ्यामध्ये लोक भगवान श्रीरामाला बघणार आहे त्यामुळे कि खूप श्रद्धेने व मेहनतीने हे पात्र साकारण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याने ह्यासाठी शारीरिक मेहनत अधिक मानसिक मेहतन घेणं सुरु केलं आहे. जोपर्यंत मी रामायण हा सिनेमा पूर्ण करणार नाही तोपर्यंत मी दारूचं सेवन करणार नाही असही Ranbir kapoor ह्याने सांगितले आहे.Ramayan हा सिनेमा ३ भागामध्ये रिलीज होणार आहे. म्हणजे रामायणा ह्या मोठ्या साहित्याला Nitesh tiwari अधिक त्यातील छोट्या छोट्या गोष्टी उलगडून सांगणार आहे. मागच्या वर्षी रामायणावर आधारित आदिपुरुष हा सिनेमा आला होता. सिनेम्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. सिनेमा रिलीज झाल्यानंतर सिनेम्याबद्दल अनेक वादाच्या गोष्टी समोर आल्या होत्या. प्रेक्षकांनी ह्या सिनेम्याच्या अनेक सिन तसेच डायलॉग ह्याबद्दल आक्षेप घेतला होता. सिनेम्याच्या चित्रीकरण, डायलॉग, अशा अनेक बाबतीत सिनेम्याने प्रेक्षकांना नाराज केलं होत, त्याचा थेट परिणाम सिनेम्याच्या कलेक्शन वर झाला. समोर मेकर्सनी अनेक सिन व डायलॉग बदलले मात्र सिनेमा पाहिजे तशी जादू करू शकला नाही. त्यामुळे नितेश तिवारी ह्या सर्व गोष्टींची काळजी घेऊनही सिनेमा तयार करतील. आदिपुरुष अगोदर प्रेक्षकांनी रामायण फक्त टेलिव्हिजन च्या माध्यमातून बघितलं होत. त्यामुळे मोठ्या पर्ध्या वर रामायणाला प्रेक्षक नेहमीच पसंती देतात. हा खूप मोठ्या प्रकारचा सिनेमा असल्यामुळे ह्या सिनेम्यासाठी मोठा बजेट व उत्तम दर्जाचे vfx लागणार आहे. त्यामुळे सिनेम्याचे पोस्ट प्रोडक्शनचे काम खूप दिवस चालणार आहे. दिगदर्शक नितेश तिवारी हे उत्तम दिग्दर्शक आहे. दंगल सारख्या त्याच्या सिनेम्याची जादू पूर्ण जगभर चालली होती. त्यांची गोष्ट सांगण्याची एक विशिष्ट शैली आहे. त्यामुळे रामायणासारख्या पवित्र महाकाव्याला नितेश तिवारी चांगला न्याय देतील अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे.

 

फिल्मी दुनियाविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.