“Lahor 1947” या सिनेम्याची बऱ्याच दिवसापासून चर्चा आहे. हा सिनेमा बॉलिवूड चे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे दिग्दर्शित करणार आहे.तर हा सिनेमा Amir khan प्रोड्युस करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Rajkumar santoshi ह्यांनी ह्या सिनेम्याची नवी अपडेट दिली असून त्यांनी सांगितले आहे कि “Lahor 1947” ह्या सिनेम्यात करण देवल हा जावेद नावाचं पात्र साकारणार आहे. सिनेम्यामध्ये जावेद नावाचं महत्वाचं पात्र आहे. ह्या सिनेम्यात Sani deval हे मुख्य भूमिकेत असून, शबाना आझमी, प्रीती झिंटा हि स्टार कास्ट सुद्धा बघायला मिळू शकते. सनी देओल व राजकुमार संतोषी ह्यांनी बॉलिवूड मध्ये एक काळ खूप गाजवला होता. राजकुमार संतोषी दिग्दर्शित सनी ने त्याच्या जीवनातील मोठे सिनेमे केले. घायल, घातक, दामिनी अश्या राजकुमार ह्यांच्या सिनेम्यांनी त्या काळात सनी देओल खूप प्रसिद्धी मिळवून दिली. तो काळ सनी देओल च्या जीवनातील अत्यंत यशस्वी होता. त्या काळात सनी देओल एक यशाच्या शिखरावर होता. आता तेच दिग्दर्शक सनी च्या मुलाला घेऊन सिनेमा बनवत आहे. राजकुमार संतोषी ह्यांनी ह्याबद्दल सांगितले कि मी बरेच दिवस झाले करण ला बघत आहे. जेव्हा जेव्हा मी करण ला सनी च्या घरी किंवा ऑफिस मध्ये भेटला आहे मी त्याच्या मध्ये एक विश्वास बघितला आहे. त्यामुळे मी ह्या बद्दल ह्या सिनेम्याचे प्रोड्युसर आमिर खान ह्याला सांगितले, त्यावेळी आमिर खान कडूनही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला व त्यांनी करण चे ऑडिशन घेण्यास सांगितले. ह्या सिनेम्यासाठी लागणारे सर्व ऑडिशन करण ह्याने दिले असून तोच ह्या पात्रा साठी सिलेक्ट झाला आहे. ह्या सिनेम्यामध्ये अनेक ड्रामा सिन आहे. त्यात सनी व करण समोरा- समोर येणार आहे. सनी ने नंतर करण च्या कास्टिंग वर प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले कि मला दिग्दर्शक राजकुमार संतोषी ह्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, ते कलाकारांकडून बरोबर त्यांचं काम काढून घेतात. करण एक मेहनती मुलगा आहे व तो त्याने साकारलेल्या पात्राला नक्की न्याय देईल. आमिर नेही ह्याबद्दल सांगितले कि मी खूप खुश आहे कि जावेद च्या पात्रासाठी करण ची कास्टिंग झाली, जावेद नावाचं खुप चॅलेंजिंग पात्र ह्या सिनेम्यामध्ये आहे व करण नक्कीच चांगलं परफॉर्मन्स देईल. करण ने ह्या सिनेम्यासाठी खूप मेहनत घेत असून तो ह्या सिनेम्यासाठी जोरात रिहर्सल हि करत आहे. सिनेम्यामध्ये सनी सोबत प्रीती झिंटा हि मुख्य भूमिकेमध्ये आहे.प्रीती हि बरेच दिवस फिल्मी जगतापासून दूर आहे. तिने तिचा शेवटचं सिनेमा भय्याजी सुपरहिट ह्यात काम केलं होत. तिने सनी देओल सोबत ह्या अगोदर “द हिरो”, फर्ज ह्या सिनेम्यामध्ये काम केलं आहे. आमिर खान ह्या सिनेम्यामध्ये गेस्ट रोल मध्ये दिसू शकतो मात्र ते अजून नक्की नाही. राजकुमार संतोषी हे 1980 च्या काळातील एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्यांनी मोठ-मोठे ब्लॉकबस्टर सिनेमे बॉलिवूड ला दिले आहे. त्यांनी सनी देओल सोबत घातक, दामिनी हे मोठे सिनेमे बनवले आहे. तसेच त्यांनी आमिर सोबतही अंदाज अपना-अपना हा सिनेमा केला आहे. राजकुमार संतोषी, अमीर खान व सनी देओल हे समीकरण पहिल्यांदाच एकत्र आले आहे. “Lahor 1947″ हा एक पिरॅडिक ड्रामा सिनेमा आहे. जो स्वातंत्र्यानंतर च्या भारत पाकिस्तान विभागणी वर आहे. राजकुमार संतोषी ह्या सिनेम्यासाठी बरेच दिवसापासून काम करत होते. हा सिनेम्याची अनाउन्समेंट गदर 2 च्या सक्सेस नंतर केली होती. ह्या सिनेम्याचं शूट सुरु झालं असून पुढच्या वर्षापर्यंत हा सिनेमा येईल.

 

फिल्मी जगा विषयी अशाच नवनवीन माहिती व अपडेट घेण्यासाठी आमच्या वेबसाईड ला http://www.filmikida.com भेट द्या.