Prabhas ची अपकमिंग मूवी Kalki 2898 द ह्या सिनेम्याची चर्चा सध्या सुरु आहे. सिनेम्याची रिलीज डेट मात्र अजून फिक्स नसून सिनेमा हा 30 मे पर्यंत सिनेम्यागृहात रिलीज होऊ शकतो. आधी 9 मे हि तारीख मेकर्सनी फिक्स केली होती, मात्र भारतातील लोकसभा निवडणूक मुळे सिनेम्याची रिलीज डेट समोर ढकलण्यात आली आहे. सायन्स फिक्शन ह्या सिनेम्यात PRABAS सोबत Dipika padukon, Amitabha bacchan, kamal hasn हि मोठी स्टारकास्ट बघायला मिळेल. सिनेम्याचा टिझर बऱ्याच दिवसापूर्वी रिलीज झाला होता. त्यात सिनेमा पूर्ण सायन्स फिक्शन आहे असे दिसून येत आहे. बॉलिवूड मध्ये सायन्स फिक्शन बिग बजेट सिनेमे खूप कमी बघायला मिळतात. याआधी रोबोट, क्रिश असे सिनेमे लोकांनी लोकांनी अनुभवले आहे. सिनेमे चांगले असले तर प्रेक्षक नक्कीच अशा सिनेम्यांना वाव देतात. त्यामुळे कल्की सारख्या सुपरहिरो ओरिएन्टेट सिनेम्याची प्रेक्षकांना नक्कीच चाहूल लागली आहे. सिनेम्याला नागा अश्विन ह्या साऊथ च्या प्रतिभावान दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे. नागा अश्विन ने सांगितले आहे हा खुप मोठा सिनेमा आहे. त्यात त्याला खूप काम करावं लागलं आहे. त्यात प्रभास ला एका सुपरहिरो च्या भूमिकेत दाखवण्यात आले व हा सिनेमा आताच्या काळाच्या पाच सहाशे वर्ष समोरची गोष्ट आहे. त्यात सायन्स ने खूप प्रगती केली असेल व एक काल्पनिक विश्व समोर बघायला मिळेल. त्यामुळे ह्या सिनेम्यात भरपूर VFX चा वापर केला असून सिनेमा हॉलिवूड ला टक्कर देणारा ठरू शकतो. सिनेम्याच्या ह्या टेक्निकल गरजा लक्षात घेता सिनेम्याला एकूण ६०० कोटी एवढा मोठा बजेट लागला आहे. सिनेम्याची कथा हि टिझर वरून फारशी कळू शकली नाही, मात्र सिनेम्यात प्रभासला सुपरपवार देऊन त्याला सुपरहिरो दाखवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिनेम्यात भारतीय हिंदू पौराणिक कथा ह्याचा आधार घेण्यात आला आहे असे कळण्यात आले आहे. भारतीय हिंदू पौराणिक कथेनुसार कल्की हा भगवान विष्णू हे अकरावा असेल व हा अवतार कलयुगाचा अंत करण्यासाठी भगवान विष्णू घेणार आहे, असे मानण्यात येते ह्या पौराणिक कथेचा आधार घेऊन सिनेमा बनवण्यात आला आहे, असे समोर आले आहे. सिनेम्याच्या मेकर्सनी ह्या मोठ्या बजेट असलेल्या ह्या सिनेम्याच्या मार्केटिंग साठी सिनेम्याचा ऍनिमेटेड व्हर्जन बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांना ह्या सिनेम्यातील पात्राची ओळख करून देण्यात येईल व त्यामुळे सिनेम्याच्यी चांगली पब्लिसिटी होईल. असे मेकर्सनी सांगितले आहे. ह्या सिनेम्याच्या ott ऍनिमेटेड व्हर्जन खरेदी करण्याकरिता अनेक ott चॅनेल मध्ये स्पर्धा लागली आहे. मात्र हे ott व्हर्जन कोणत्या चॅनेल वर रिलीज होईल हे मात्र ठरू शकले नाही. प्रभास चे मागचे सिनेमे फारशे खास गेले नाही. सालार हा त्याचा सिनेमा सोडला तर बाहुबली नंतर प्रभास चे चाहते त्याच्या मोठ्या ब्लॉकबस्टर सिनेम्याची बघत आहे. त्यामुळे कल्की मुळे हि कमतरता कमी होऊ शकते. दीपिका व प्रभास पाहिलांदा एकत्रकाम करत असून अमिताभ बच्चन ह्या सिनेम्याचा हिस्सा आहे.