नुकतच Janhavi kapur  हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर तिचा आगामी सिनेमा “mr and mrs mahi” ह्याच पोस्टर शेअर केलं आहे. त्यात सिनेमा ३१ मे ला प्रदर्शित होणार आहे असं दिसत आहे. तसेच ह्या सिनेम्यात मुख्य भूमिकेत असलेला Rajkumar ravह्यानेही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर सिनेम्याचं पोस्टर शेअर केलं आहे. “mr and mrs mahi” हा स्पोर्ट ड्रामा सिनेमा आहे. बऱ्याच दिवसापासून ह्या सिनेम्याची चर्चा होती मात्र अनेक पोस्टपोन्ड नंतर हा सिनेमा शेवटी प्रदर्शित होणार आहे. सिनेम्यात जान्हवी कपूर व राजकुमार राव हे दोन्ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ह्या सिनेम्यात टिझर बऱ्याच दिवसापूर्वी आलं होत मात्र बऱ्याच अडचणी मुळे हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला. जान्हवी कपूर बऱ्याच दिवसापासून ह्या सिनेम्यासाठी फिजिकल मेहनत घेत होती. ती दोन वर्षा पासून क्रिकेट शिकत आहे असे तिने सांगितले होते. तिने तर ह्या सिनेम्यासाठी प्रॉपर क्रिकेटर अभिषेक नायर व इंडियन क्रिकेटर दिनेश कार्तिक ह्यांच्याकडून ट्रेनिंग घेतली आहे असे तिने एका इंटरव्हू मध्ये सांगितले. हा सिनेमा एक स्पोर्ट ड्रामा सिनेमा असल्यामुळे त्यात जान्हवी कपूर हिला फिट असणे फार गरजेचं होत त्यामुळे जान्हवी कपूर हिने ह्या सिनेम्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, असे तिने सांगितले. Sharan sharma  हा  सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. नेटफ्लिक्स वर आलेला गुंजन सक्सेना ह्या सिनेम्यालाही शरण शर्मा ह्याने दिग्दर्शित केलं होत त्यात जान्हवी कपूर हि एका पायलट च्या भूमिकेत दिसली होती. म्हणजे जान्हवीचा शरण शर्मा सोबतच दुसरा सिनेमा आहे. जान्हवी व राजकुमार राव हे मात्र पाहिलांदाच सोबत काम करताना दिसतील. सिनेम्याच्या कथेबद्दल फारस काही कळू शकलं नाही मात्र सिनेमा एका महिला क्रिकेटरच्या जीवनाबद्दल भाष्य करणारा असेल असे समोर आले आहे, त्यात जान्हवी हि एका क्रिकेटरच्या भूमिकेत दिसेल मात्र ह्या स्पोर्ट ड्रामा सिनेम्यात लव्हस्टोरी हि दिसेल हे नक्की आहे. ह्या अगोदर क्रिकेटरच्या जीवनावर आधारित अनेक सिनेमे आले. त्यात मागच्या वर्षी आलेला घुमर असो किंवा महिला क्रिकेटर मिताली राज हिची बायोग्राफी” शाबास मितु” हा सिनेमा असे अनेक सिनेमे येऊन गेले मात्र त्यांना पाहिजे तसे बॉक्सऑफिस सक्सेस मिळालं नाही त्यामुळे mr and mrs mahi ह्या सिनेम्यात काय वेगळं बघायला मिळते हे सिनेमा आल्यावरच कळेल. हा सिनेमा धर्मा प्रोडक्शन ने प्रोड्युस केला असून करण जोहर हा ह्या सिनेम्याचा निर्माता आहे. 31 मे ला सिनेमा सिनेम्यागृहात प्रदर्शित होणार आहे.