Kalki 2898 AD ह्या प्रभास च्या सिनेम्याचे मेकर्सकडून हळू हळू ह्या सिनेम्याच्या पात्रांना लोकांसमोर आणलं जात आहे. सर्वात आधी ह्या सिनेम्याचा टिझर दिग्दर्शक Naga ashwin ह्याने बऱ्याच दिवस आधी रिलीज केला. त्यामुळे ह्या सिनेम्याची चांगली जाहिरात झाल्यानंतर नागा अश्विन ने ह्या सिनेम्यातील मोठया पत्रांपैकी एक प्रसिद्ध पात्र अश्वत्थामा हे Amitabha bacchan ह्यांनी साकारलेले पात्र, ह्याची एक झलक लोकांसमोर आणली, अमिताभ बच्चन ह्यांच्या अश्वस्थामा लुक ने ह्या सिनेम्याच्या प्रसिद्धी मध्ये अजून वाढ झाली व व सिनेमा रिलीज होण्याच्या अगोदरच ह्याचे चांगले राईट विकले गेले. आता सिनेम्याचं एक आगळंवेगळं पात्र दिग्दर्शक ह्याने मोठा इव्हेंट करून इंट्रोड्युस केलं आहे. सिनेम्यात भैरवा हे Prabhas च्या पात्राजवळ एक आगळीवेगळी कार असणार आहे. तीच नाव Bujji अस दिलेले आहे. हि स्पेसिअल कार असून ह्या कार मध्ये सुपर पावर आहे, व टिझर मध्ये दाखवल्याप्रमाणे भैरवा ह्या कार ला कमांड करत असून ती कमांड बुज्जी पूर्ण करत आहे. बुज्जी हि भैरवाशी बोलत आहे. बुज्जी ह्या कार ला कीर्ती सुरेश ह्या साऊथ च्या अभिनेत्री ने आवाज दिला आहे. टिझर मध्ये भैरवा व बुज्जी चा संवाद दाखवला असून बुज्जी मध्ये असलेल्या सुपर पावर बघायला मिळते. हि कार बनवण्यासाठी नागअश्विन ने मेहेंद्रा कंपनी ला स्पेसिअल ऑर्डर दिली होती. ह्या कार साठी तब्बल 8 कोटी एवढा खर्च आला आहे. कल्की हा खूप बिग बजेट सिनेमा आहे. त्यामध्ये VFX जास्तीत जास्त वापर केला असून ऍक्शन पट असलेल्या ह्या सिनेम्यासाठी सिनेम्याच्या जाहिराती साठी मोठा खर्च करत आहे. दिगदर्शक नागा अश्विन ह्याने ह्या मोठ्या बजेट असलेल्या सिनेम्याच्या फक्त बुज्जी सुपर पावर असलेल्या कार ला इंट्रोड्युस करण्यासाठी मोठा इव्हेंट आयोजित केला होता व प्रभास स्वतः ह्या इव्हेंट मध्ये बुज्जी कार चालवत लोकांसमोर आला होता. बुज्जी ह्या सुपर पावर कार ला प्रेक्षकांनी बघितल्यावर ह्या सिनेम्याबद्दल लोकांना अजून उत्सुकता वाढली आहे. कल्की 2898 AD हा सिनेमा एक पुरातन धार्मिक ग्रंथ कथा व आधुनिक टेक्नॉलॉजी ह्याची सरमिसळ असून ह्यामध्ये प्रभास, अमिताभ बच्चन व दीपिका पाडूनकोन ह्या सारखे मोठे चेहरे बघायला मिळणार आहे. सिनेम्यामध्ये हॉलिवूड सारखे पहिल्यांदा ऍक्शन सिन असून भविष्यातील पाचशे सहाशे वर्ष समोरील हि कथा आहे. सिनेम्यामध्ये भैरावा हे मुख्य पात्र असून पृथ्वी वर येणाऱ्या मोठ्या महाभयानक संकटापासून तो आपल्या सुपर पावर ने तो लोकांचे संरक्षण करणार आहे.
फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.