Divya ghosala kumar हिचा “Savi” हा सिनेमा येत्या 31 मे ला प्रदर्शित होणार आहे. ह्यात दिव्या घोसला कुमार हि सावि ह्या भूमिकेत असून, तीची ह्या सिनेम्यात मुख्य भूमिका आहे. त्यासोबतच त्या सिनेम्यात तिच्या सोबत हर्षवर्धन राणे, Anil kapur ह्या सिनेम्यात झळकणार आहे. सावि हि ह्या सिनेम्यात एक साधारण गृहिणी च्या भूमिकेत आहे. व हर्षवर्धन तिच्या पतीच्या भूमिकेत आहे. तिच्या पतीला खोट्या आरोपाखाली पोलीस कोठडी मध्ये डांबण्यात येते. त्यामुळे एकट्या पडलेल्या सामान्य महिला स्वतः आपल्या पतीला सोडवण्यासाठी पुढाकार घेते. जेव्हा आपल्या कुटुंबावर संकट येतात तेव्हा एक साधारण महिला आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी काय करू शकते हे आपल्याला हा सिनेमा बघितल्यावर कळू शकते. सिनेम्यात सुरवातीला एक आनंदी कुटुंब दाखवण्यात येईल मात्र कुटुंबावर जसजसे संकट येतील तेवढा हा सिनेमा क्राईम थ्रिलर बनत जाईल. T सिरीज ची मालकीण म्हणजे दिव्या Divya ghosala kumar हिने आतापर्यंत अनेक सिनेमे व अल्बम सॉंग केले आहे, त्यामध्ये तिचा प्रत्येक सिनेम्यात किंवा अल्बम सॉंग मध्ये एक ग्लॅमरस लूक दाखवण्यात आला आहे. मात्र ह्या सिनेम्यात तिने पूर्ण सिनेम्यात एकदाही चेहऱ्याला मेकअप केला नाही असे तिने ट्रेलर लाँच च्या वेळी सांगितले आहे. तिने सांगितले कि सिनेम्याचा दिग्दर्शक अभिनय देव ह्याने मला सांगितलं होते कि मला तुला एका एक साधारण स्त्री च्या भूमिकेत दाखवायचे आहे, त्यामुळे मी ह्या पूर्ण सिनेम्यात एकदाही मेकअप केला नाही असे तिने सांगितले आहे. ह्या सिनेम्यात लंडन येथील लोकेशन दाखवण्यात आले आहे, त्यामुळे ह्या सिनेम्याचं शूटही लंडन येथेच झालं आहे. -6 डिग्री सेल्सियस अशा प्रतिकूल परिस्थितीत ह्या सिनेम्याचं शूट करावं लागलं आहे, ह्या सिनेम्याच्या शूटिंग च्या दरम्यान दिव्या घोसला कुमार हिला एकदा एक्शन करताना डोक्याला इजाही झाली होती, असं सांगितलं आहे. सिनेम्याला मुकेश भट ह्यांच्या विशेष फिल्म ने प्रोड्युस केलं आहे. मुकेश भट ह्यांच्या सिनेमांची एक खास ओळख आहे. त्यांच्या सिनेम्यात क्राईम थ्रिलर बघायला मिळतो, तसेच ह्या क्राईम थ्रिलर सिनेम्यांनी हिट गाणी दिलेली आहे. त्यामुळे ह्या हि सिनेम्यात त्याच प्रकारचे मिश्रण बघायला मिळू शकते. ह्या सिनेम्यात एक गाणं Kk च्या आवाजातलं आहे. मुकेश भट ह्यांच्या अनेक सिनेम्यांना KK ह्याने आवाज दिला होता. KK ह्याचा मागच्या वर्षी हृदय विकारानं मृत्यू झाला. मरण्याच्या अगोदर त्याच हे शेवटचं गाणं आहे.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.