7 जून ला Munjya हा सिनेमा रिलीज झाला आहे. कोणतेही मोठे प्रमोशन व मोठे स्टार कास्ट नसलेल्या ह्या सिनेम्याने अपेक्षेपेक्षा चांगलं बॉक्सऑफिस कलेक्शन केलं आहे. सिनेमा रिलीज होऊन तीन दिवस झाले असून ह्या सिनेम्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन हाती आलं आहे. Munjua ह्या सिनेम्याला ह्या मराठमोड्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे. हॉरर कॉमेडी असलेल्या मुंज्या ह्या सिनेम्यात Abhay varma, sharvari mona sing हि स्टार कास्ट असून सिनेमा हा मुंज्या ह्या हॉरर पात्राची गोष्ट आहे. मुंज्या त्याच्या मागच्या जीवनातील प्रेयसी च्या शोधात असून संपूर्ण कथा त्याच्या भोवती फिरते. सिनेम्यात मुंज्या हे पात्र cji चा वापर करून बनवलं आहे. मुंज्या च्या मागच्या जीवनातील रहस्यमय गोष्टीचा उलगडा होताना प्रेक्षकांना हा सिनेमा गोष्टीशी धरून ठेवतो व अपेक्षेप्रमाणे उत्कंठा वाढवत हा सिनेमा प्रेक्षकांचे हॉरर मनोरंजन करतो. सिनेम्यात सर्व फ्रेश चेहऱ्यांना घेण्यात आले असून मुंज्या तील सर्व पात्रांवर प्रेक्षकांचा लगेच विश्वास बसतो. मॅडोक फिल्म चा हॉरर फ्रेंचायजी मधील हा चौथा सिनेमा आहे. आधी स्त्री,रुही,भेडिया व आता मुंज्या हा सिनेमा मॅडोक फिल्म ने हॉरर बनवला आहे.

Munjya box office collection
मुंज्या ह्या सिनेम्याला रिलीज होऊन 3 दिवस झाले आहे. सिनेमा 7 जून ला रिलीज झाला होता. सिनेम्यात कोणतीही मोठी स्टार कास्ट नसून सर्व फ्रेश नवी स्टार कास्ट आहे, त्यामुळे सिनेम्याचा बजेट जास्त मोठा नसून सिनेमा कमी बजेट मध्ये बनवला आहे. http://www.sacnilk.com नुसार सिनेम्याने आपल्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 4 कोटी एवढं कलेक्शन केलं होत. कमी बजेट असलेल्या व कोणतीही मोठी स्टार कास्ट नसलेल्या ह्या सिनेम्याचं हे चांगलं ओपनिंग मनाली जाते. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सिनेम्याच्या कलेक्शन मध्ये वाढ झाली व सिनेम्याने 7.25 कोटी एवढं कलेक्शन केलं. सिनेम्याने आपल्या दोन दिवसात 11.25 कोटी. कलेक्शन केलं सिनेम्याच्या कलेक्शन मध्ये रविवारी अजून वाढ झाली व सिनेम्याने 8 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. म्हणजे सिनेम्याने फक्त तीन दिवसात 19.25 एवढं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. सिनेम्याच्या कलेक्शन मध्ये अजून वाढ होणार. सध्या सिनेगृहात मुंज्या सोडून माही, सावि हे सिनेमे असून हेही सिनेमे चांगल कलेक्शन करत आहे. मुंज्या च हे कलेक्शन समाधान कारक असून सिनेम्याने आपलं बजेट पूर्ण केलं असून सिनेमा हिट होणार हे नक्कीच आहे.

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.