2021 मध्ये आलेला “Pushpa” the rise हा सिनेमा सगळ्यांना आठवत असेल. करोना मध्ये आलेला ह्या सिनेम्याने चांगलाच हल्ला केला होता. सिनेमा एवढा प्रसिद्ध झाला कि कोरोना सारख्या अवघड काळातही लोक सिनेम्यागृहात जाऊन हा सिनेमा बघू लागले. सिनेम्यातील गाणी डायलॉग चांगलेच प्रसिद्ध झाले. सिनेम्याने बॉक्सऑफिस वरही चांगला गल्ला जमवला. तामिळ भाषेतील हा सिनेमा पूर्ण पॅन इंडिया प्रदर्शित केला होता. त्यामुळे सिनेमा जेवढा साऊथ च्या लोकांनी डोक्यावर घेतला तेवढाच तो पूर्ण भारतातही प्रसिद्ध झाला. ह्या सिनेम्यासाठी अल्लू अर्जुन ह्याला नॅशनल अवॉर्डही मिळाला. त्यामुळे अल्लू च्या जीवनातील हा स्पेशल सिनेमा बनला तेवढाच तो रश्मीका मंदाना हिच्यासाठीही लकी ठरला. रश्मिका हिने ह्या अगोदर अनेक साऊथ सिनेम्यामध्ये काम केलं होत. व तिथे तिला चांगलं स्टारडम मिळालं होत. मात्र पूर्ण भारतात तिला खरी ओळख मिळवून दिली ती पुष्पा ह्या सिनेम्याने. ती पूर्ण भारताची क्रश बनली. आता पुष्पा ह्या सिनेम्याचा दुसरा पार्ट “Pushpa” the rise ह्या सिनेम्याचा टिझर आला आहे. अल्लू अर्जुन ह्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सिनेम्याचा टिझर प्रदर्शित करण्यात आला असून सिनेमा 15 ऑगस्ट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेम्याच्या टिझर मध्ये कोणतेच डायलॉग नसून फक्त एक ऍक्शन सिन बघायला मिळत आहे त्यात पुष्पा ने साडी परिधान केली असून एका बाईचा रूप धारण केलं आहे. सिनेम्याच्या टिझर ची लोक बरेच दिवस वाट बघत होते त्यामुळे काही तासातच टिझर ला करोडो व्हू मिळाले. सिनेम्याचे दिगदर्शक सुकुमार ह्यांनी सांगितले होते कि सिनेम्याची शूटिंग इंडिया मध्ये तसेच जपान मधेही करण्यात आली आहे. सिनेमा हा 15 ऑगस्ट ला पूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. पुष्पा सिनेम्याचा शेवट हा अर्धवट राहिलेला होता, त्यामुळे सिनेम्याचा पुढचा पार्ट येणार हे नक्की होते. पुष्पा ची क्रेज बघून मेकर्सनी सिनेम्याचा तिसरा पार्ट हि बनवण्याचा विचार केला आहे. सिनेम्याचं तिसऱ्या भागाचं नाव पुष्पा दि रोअर असे असू शकते.