आपण जगात अनेक आंधळे लोक बघत असतो हे लोक दररोज जंगण्यासाठी धडपड करत असतात. ज्या डोळ्यांच्या भरवश्यावर आपण हे सुंदर जग बघत असतो तेच डोळे त्यांना नसतात. त्यामुळे वैयक्तिक विकासासाठी त्यांना जे स्किल आत्मसात करावे लागते ते मिळवण्यासाठी ह्या लोकांना अनेक अडचणी येतात. शिक्षण, कौशल्य, कला किंवा अनेक उपजीविकेच्या गोष्टी पासून हे लोक वंचित राहतात व अनेकदा ह्या लोकांवर भीक मागण्याची पाळी येते. अशीच एक लहानपणापासून अंध व्यक्ती त्याच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा वापर करून उच्चशिक्षणापर्यंत मजल मारली व उच्च शिक्षण घेऊन स्वतःची कंपनी उभारून हा व्यक्ती भारतातील पहिला अंध बिजनेस मन बनला. हि गोष्ट आहे. Shrikant bolla ची. आंध्रप्रदेशात जन्मलेल्या ह्या अंध बिजिनेस मॅन वर आता सिनेमा येत आहे. सिनेम्यात Rajkumar rao हा श्रीकांत ह्यांच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे, Tushar hiranadani ह्यांनी तर सिनेमा प्रोड्युस केला आहे टी सिरीज ने. सिनेम्यात शरद केळकर ,आलाय फर्निचरवाला व ज्योतिका हि स्टारकास्ट सहाय्यक भूमिकेत बघायला मिळणार आहे. सिनेम्यात श्रीकांत ह्या अंध बिजनेस मॅन चा पूर्ण जीवनप्रवास दाखणयात आला आहे. अतिशय सामान्य कुटुंबात श्रीकांत ह्याचा जन्म झाला. मात्र लहानपणापासून शिक्षणाची आवड असलेल्या श्रीकांत ह्याने प्रत्येक वर्गात टॉप केलं व भारतातील नावाजलेल्या औद्योगिक शिक्षण संस्थेत ऍडमिशन मिळवल. शिक्षण पूर्ण करून श्रीकांत ह्यांनी स्वतःची बोलँड इंडस्ट्री स्थापन केली व आपल्यासारख्या हजारो लोकांना काम दिल. अशा ह्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला राजकुमार राव ह्याने तेवढ्यात मेहनतीने व कौशल्याने साकारलं आहे हे ट्रेलर मधून दिसत आहे. राजकुमार राव ह्याला हि भूमिका ऑफर झाल्यावर त्याला अशा चॅलेंजिंग भूमिका करायला आवडतात असे त्याने सांगितले व पटकन होकार दिला. त्याच्या सोबत साऊथ इंडस्ट्रीतील एक्टरेस जोतिक हि श्रीकांत ह्याच्या टिचरच्या भूमिकेत आहे. त्यासोबतच आपल्याला ह्या सिनेम्यात अनेक खरे आंधळे कॅरेक्टरही बघायला मिळणार आहे. 10 मे ला हा सिनेमा सिनेमागृहात बघायला मिळणार आहे.