Salaman khan बॉलिवूड मधील असा स्टार आहे कि त्याच्या आगामी सिनेम्याची लोक नेहमीच वाट बघत असतात. आणि सलमानही त्याच्या चाहत्यांना नाराज करत नाही तो नेहमीच प्रेक्षकांसाठी सतत अभिनय क्षेत्रात काम करत असतो. त्याने मागे त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वर आपल्या आगामी सिनेम्याचे अपडेट दिले होते. ह्या ईद च्या दिवशी त्याने Sikandar ह्या त्याच्या आगामी सिनेम्याचे पोस्टर शेअर करत त्याच्या चाहत्यांना ईद चे गिफ्ट दिले होते. Sikandar हा त्याचा आगामी सिनेमा असणार आहे. हा सिनेमा साऊथ दिग्दर्शक a r murgudas डायरेक्ट करणार आहे, तर Sajid nadiyavala ह्या सिनेम्याला प्रोड्युस करणार आहे. ह्या सिनेम्याचे शूटिंग वर्षभर वेगवेगळ्या देशामध्ये चालणार आहे तर २०२५ च्या ईद च्या दिवशी हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिकंदर हा सिनेमा सलमान साठी खूप खास सिनेमा असणारा आहे, मागचे बरेच सिनेमे सलमान साठी काही खास करू शकले नाही “टायगर” जिंदा है हा त्याचा शेवटच्या हिट सिनेमा होता त्यानंतर त्याचे “किसी का भाई किसी कि जान” व “टायगर ३” हे दोन्ही सिनेमे काही खास करू शकले नाही. दोन्ही सिनेम्याने सलमान खान च्या स्टारडम ला साजेस अस कलेक्शन केलं नाही त्यामुळे सलमान परत बॉक्सऑफिसवर कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहे. ह्या सिनेम्याचे अजून खास गोष्ट अशी आहे कि ह्या सिनेम्यात साजिद नाडियावाला हा सिनेम्याचा प्रोड्युसर आहे, साजिद व सलमान हि बॉलिवूड मधील ऍक्टर प्रोड्युसरची खूप प्रसिद्ध जोडी आहे. ह्यांनी आतापर्यंत जेव्हा जेव्हा सोबत काम केलं आहे, सिनेमा हिट ठरला आहे त्यामुळे सिकंदरही हिट ठरू शकतो. साजिद च्या जीवनातील हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. कारण साजिद ह्या सिनेम्यासाठी जवळ जवळ ४०० कोटी खर्च करणार आहे. मिळालेल्या माहिती नुसार हा एक ऍक्शन सिनेमा असणार असून ह्या साठी मोठे मोठे सेट व अलग अलग देशांमध्ये हा सिनेमा शूट होणार आहे त्यामुळे भलामोठा बजेट ह्या सिनेम्यासाठी खर्ची होणार आहे. सिनेम्याचे दिग्दर्शक a r murgudas हे साऊथ चे एक स्किल दिग्दर्शक आहे. साऊथ इंडस्ट्रीला त्यांनी अनेक हिट दिले आहे. तसेच त्यांनी बॉलिवूड मध्ये हि “गजनी”, हॉलिडे सारखे सिनेमे दिले आहे. गजनी हा तर बॉलिवूड मधील पहिला सिनेमा आहे ज्याने फक्त भारतात १०० कोटी च कलेक्शन केलं होत. त्यामुळे a r murgudaस चे दिग्दर्शनाचा अनुभव हिंदी प्रेक्षकांनाही आहे. मुरगुदास ह्यांनी सांगितले आहे ती बरेच दिवसांपासून सलमान सोबत काम करण्यासाठी उत्सुक होते, त्यांनी गजनी पहिल्यांदा सलमानला ऑफर केला होता मात्र काही कारणामुळे सलमान हा सिनेमा करू शकले नाही त्यामुळे सिकंदर मुळे हा योग्य जुळून आला आहे. सिकंदर ह्या सिनेम्यात सलमान सोबत Rashmika mandana मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका ने तिच्या सोशिअल मीडिया अकॉउंट वर ह्याची माहिती दिली आहे. तिने सांगितल आहे. माझे चाहते मला नेहमीच विचारात असतात कि तुमचा आगामी सिनेमा कोणता तर मला सांगायला खूप आनंद होत आहे कि सलमान खान स्टारर सिकंदर ह्या मी काम करणार आहे. सलमान बॉलिवूड मध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे प्रसिद्ध आहे. त्यातील एक कारण हे पण कि सलमान अनेक वेगवेगळ्या अभिनेत्र्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसतो. बॉलिवूड मधील अनेक मोठ्या अभिनेत्र्यांचे करिअर ची सुरवात सलमान च्या सिनेम्यापासूनच झाली आहे. बऱ्याच अभिनेत्र्यांना तर सलमान मुळे स्टारडम मिळाले आहे. काहींचे थांबलेले करिअर सलमान मुळे मार्गी लागलेले आहे, त्यामुळे सलमान सोबत रश्मीका ला स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली हे तिच्या करिअर साठी फायद्याचं ठरू शकते. रश्मीका सध्या तिच्या करिअर च्या शिखरावर आहे. तिने ज्या ज्या सिनेम्यात काम केलं आहे. तो सिनेमा हिट ठरत आहे. साऊथ इंडस्ट्रीत नाव कमावलेल्या रश्मीका हिने पुष्पा मुले हिंदी प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं आहे. त्याच्यानंतर आलेल्या तिचा ऍनिमल ह्या सिनेमाही तुफान गाजला आहे. तसेच तिचा आगामी पुष्पा द रुल ह्या सिनेम्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे म्हणजे रश्मीका बॉलिवूड ला एका मागून एक हिट सिनेमे देण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामध्ये अजून सिकंदर ह्या सिनेम्याची भर पडणार आहे. तसेच सलमान साठीही रश्मीका लकी चार्म ठरू शकते.

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईड  http://www.filmikida.com ला भेट द्या.