Aaliya bhat सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये बिझी आहे. तिचा आगामी सिनेमा “Jigra” ह्याचा टिझर बऱ्याच दिवसाच्या अगोदर रिलीज झाला होता. जिग्रा बद्दल आलियाने सांगितले आहे, हा सिनेमा २७ सप्टेंबर ला सिनेमागृहात येणार आहे. सिनेम्यात Aliya bhat सोबत Vedang raina मुख्य भूमिकेत आहे. सिनेम्याच्या टिझर मध्ये सिनेमा दोन भावंडांची कथा आहे. आलीय व वेदांग हे दोन्ही बहीण भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. आलियाने सिनेम्याच्या शूटिंगचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर टाकले होते. त्यात दोघांची चांगली केमिस्ट्री दिसत आहे. हा सिनेमा वसंत बाला ह्यांनी दिग्दर्शित केला आहे. आलीय हि एका बहिणीच्या भूमिकेमध्ये असून तिच्या भावावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला ती सामोरा जाणार आहे. हा सिनेमा एक ऍक्शन थ्रिलर सिनेमा असणार आहे. सिनेम्यात आलियाचा लूक थोडा वेगळा दिसणार आहे. त्यासाठी तिने खूप वजन कमी केलं आहे. व तिचा चेहरा थोडा जपानी ढंगाचं दाखवला आहे. ह्यामागे काय कारण आहे हे कळू शकले नाही. आलीय ह्या सिनेम्यात फक्त अभिनेत्री नाही तर ती ह्या सिनेम्याची प्रोड्युसर हि आहे. धर्मा प्रोडक्शन सोबत आलियाची इटेरनल सनशाईन हि कंपनी ह्या सिनेम्याची निर्मिती करणार आहे. आलीय एका इंटरव्हू मध्ये म्हणाली माझा हा तिसरा प्रोड्युसर म्हणून सिनेमा आहे. सिनेम्यात प्रोड्युसर म्हणून माझ्या कॉप्रोड्युसर कडून मला अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या, हळू हळू मी प्रोड्युसर ची जबाबदारी हि स्वीकारत आहे. वेदांग रैना ह्या अगोदर द आर्चिस ह्या सिनेम्यात झळकला होता. आलियाने खूप कमी वेळात आपल्या अभिनय करियर मध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आहे. कमी वयात तिच्या चांगले विषय असलेले सिनेमे आले. जिग्राहि असाच सिनेमा असणार आहे. आलियाने तिची इटेरनल सनशाईन हि प्रोडक्शन कंपनी सुरु केली आहे. त्यात तिने डार्लिंग, पोर्चर असे काही सिनेमे प्रोड्युस केले आहे. म्हणजे अभिनयाबरोबर ती प्रोड्युसरची जबाबदारीही सांभाळत आहे.