Kajol हि 90 दि च्या दशकातील मोठ्या हिरोईन पैकी एक नाव. तिने तिच्या अभिनयाच्या सुवर्ण काळात अनेक हिट सिनेमे बॉलिवूड ला दिले. नंतर तीच लग्न अभिनेता Ajay devagan ह्याच्याशी झाल्यानंतर काजोल ने अभिनय क्षेत्राकडे पुरती पाठ फिरवली व आपलं पूर्ण लक्ष आपल्या संसाराकडे वळवलं. बऱ्याच मोठा काळ आपल्या संसारात घालवल्यानंतर काजोल हिने परत बॉलिवूड मध्ये पुनरागमन करत अनेक सिनेमे केले. सध्या ती सिनेमांसोबत वेब सिरीज हि करत आहे. तिने परत आपलं पूर्ण लक्ष आपल्या अभिनय क्षेत्राकडे वळवलं व एकामागून एक सिनेमे, वेबसिरीज ती करत आहे. तिने मागच्या काळात तानाजी, दिलवाले, सलाम वेंकी हे सिनेमे केले आहे, तर द ट्रायल ह्या वेब सिरीज मध्ये ती एका अफलातून वकिलाच्या भूमिकेत दिसली, ह्या तिच्या बिझी शेड्युल ला पुढे सुरु ठेवत अजून एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला ती घेऊन येणार आहे. महारागिणी ह्या तिच्या नव्या सिनेम्याचं टिझर अजय देवगण ह्याने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वर शेअर करत, लेडी सिंघम अशी कॉमेंट केली आहे. महारागिणी ह्या सिनेम्यात काजोल सोबत “Prabhudeva” “Nasuruddin shaha” हि कास्ट दिसणार आहे. प्रभुदेवा व काजोल ह्यांनी एकत्र 1997 मध्ये “Minsar kanavu” ह्या तमिळ सिनेम्यात काम केलं होत. हा एक तमिळ लव्हस्टोरी सिनेमा होता ह्या सिनेम्याला राजीव मेनन ह्याने दिग्दर्शित केला होता. आता पुन्हा 27 वर्षा नंतर पुन्हा एकदा ह्या जोडीला एकत्र आणत महारागिणी हा सिनेमा घेऊन येत आहे. सिनेम्यात काजोल चा ऍक्शन मोड दाखवला आहे. सिनेम्याच्या नावावरून सिनेम्यात काजोल ची मध्यवर्ती भूमिका आहे असा दिसत आहे. भारतातील धार्मिक ग्रंथानुसार महारागिणी हे स्त्रियांना दिलेलं विशेषण आहे. पुरुषप्रधान भारतील संस्कृतीत नेहमीच पुरुषांनी स्त्रियांवर मालकी हक्क दाखवला आहे मात्र आता काळ बदलला असून स्त्रियांही त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार विरुद्ध लढू शकतात असे सिनेम्यात दाखवलं आहे. सिनेमा एक ऍक्शन ड्रामा आहे. दुसरी कडे अजय हि त्याच्या अभिनय कॅरिअर मध्ये खूपच बिझी आहे. त्याच्या आगामी सिनेमा सिंघम अगेन ह्या सिनेम्याचं शूट सुरु आहे त्यामुळे एकी कडे अजय ऍक्शन करताना दिसेल तर दुसरी कडे Kajol ऍक्शन करताना दिसणार आहे. सिनेम्याच्या ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.