Farzi  हि Shahid kapur ची वेबसिरीज सगळ्यांनाच आठवत असेल. 2023 साली ह्या सिरीज चा पाहिलं सीजन रिलीज झालं होत. शाहिद ने ह्या वेबसीरीज मधून OTT प्लॅटफॉर्म वर पदार्पण केलं, व त्याच्या नशिबानं हि वेबसीरीज लोकांना खूप आवडली होती. 2023 मध्ये सगळ्यात जास्त बघितली गेलेली हा OTT कंटेंट होता. फर्जी हि सर्वात जास्त सर्च केलीली व सगळ्यात जास्त बघितली गेलेली सिरीज होती. ह्या सिरीज चे IMDb रेटिंग 8.4 ऐवढे होते. ह्या हिट सिरीज ला दिग्दर्शित केले होते Raj and DK ह्या जोडीने. ह्या दिगदर्शकांच्या जोडीने फॅमिली मॅन सारख्या वेबसिरीज ला सुद्धा दिग्दर्शित केले आहे. त्यांच्या फॅमिली मॅन हि वेब सिरीज सुद्धा चांगली बघितली गेलेली वेबसिरीज आहे. त्यामुळे Shahid kapoor ह्याची Farzi हे सीजन मेकर्स कधी रिलीज करणार हे प्रेक्षक सर्च करत आहे. ह्या सिरीज मध्ये शाहिद ह्याच पात्र सन्नी ह्या नावाचं असत. सनी हा खूप उत्कृष्ट पेंटिंग करतो, त्यामुळे तो स्वतःचे नाव आर्टिस्ट अस ठेवतो. शाहिद ह्याच आर्टिस्ट हे पात्र इतकं फेमस झालं आहे कि शाहिद जिकडे जातो त्याला लोक आर्टिस्ट नावानं बोलत आहे असत शाहिद ने एक मुलाखतीत सांगितले आहे. आर्टिस्ट व फिरोज नावाचे दोन मित्र असतात. मुंबईसारख्या स्वप्ननगरी राहणाऱ्या ह्या सामान्य दोन तरुणांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असते मात्र त्यांचे स्वप्ने खूप मोठे असतात. आर्टिस्ट चे आजोबा एक वर्तमान पत्राची प्रेस चालवतात जी बंद पडण्याच्या मार्गावर असते. आर्टिस्ट च्या आजोबांवर प्रेस चालू ठेवण्यासाठी भले मोठे कर्ज झालेलं असत. त्यामुळे आर्टिस्ट व फिरोज ह्या आर्थिक पेचातून बाहेर पडण्यासाठी व कायमची गरिबी दूर करण्यासाठी चुकीचा मार्ग निवडतात व स्वतःच्या न्यूज पेपर प्रेस मध्ये खूप गुप्त मार्गाने नोटा छापू लागतात. आर्टिस्ट ला डिझाईन मध्ये कला अवगत असते जर फिरोज हा प्रेस चा जाणकार असतो हि जोडी चक्क चुकीच्या मार्गाने पैसा छापू लागते. ह्या सिरीज शाहिद कपूर व भुवन अरोरा ह्या सोबत Vijay sethupati, Rashi khanna हि स्टार कास्ट हि आहे. विजय पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत तर राशी एका RBI अधिकाऱ्या च्या भूमिकेत आहे. पूर्ण सिरीज मध्ये मायकल हे विजय सेथुपती ह्याच पात्र आर्टिस्ट च्या मागे त्याचा शोध घेत असते. ह्या मांजर उंदीर च्या खेळात कोण जिंकत हे पहिल्या सीजन मध्ये अपूर्ण ठेवलं आहे. त्यामुळे ह्या राहिलेल्या सीजन 2 ची लोक आतुरतेने वाट बघत आहे. ह्या सिरीज मध्ये एक खास गोष्ट म्हणजे शाहिद कपूर ह्याची ऍक्टिंग. एके काळी शाहिद बॉलिवूड मध्ये चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जात होता. मात्र फर्जी मध्ये त्यांच्या वेगळ्या अश्या रागीट अभिनयाची हि लोकांनी झलक बघितली आहे. खूप मोठी स्वप्न असलेला सामान्य मुलगा जेव्हा गुन्हेगारी पद्धतीने पैसा कमावतो तेव्हा त्याची मानसिकता काय असते हे शाहिद ने त्याच्या अभिनयातून उत्तम पद्धतीने मांडले आहे. शाहिद च्या अभिनयाबरोबर ह्या वेबसिरीज मध्ये दिग्दर्शनाला पूर्ण गुण दिले पाहिजे. वेबसिरीज हि दोन सामान्य मुलांची गोष्ट म्हणून सुरु होते. त्यात त्यांच्या जीवनात जे घटते जे रोज लाखो सामान्य मुलांची आयुष्यात घडत असेल. पुढे हि गोष्ट ह्या दोन पात्रांना नोटा छापण्या सारख्या असामान्य गुन्ह्या पर्यंत घेऊन जाते. त्यामध्ये नोटा छापण्यासाठी काय बारीक गोष्टी लागतात व नोटमध्ये काय काय बारीक गोष्टी लपलेल्या असतात हे जवळून दाखवले जाते. व नंतर पोलीस कश्याप्रकारे ह्या दोन मुलांच्या शोध घेतात हा रोमांच असा बरोबर मेळ दिग्दर्शकांनी घातला आहे. वेबसिरीज च्या शेवटी हि गोष्ट दिग्दर्शकांनी अपूर्ण ठेवली असून सीजन 2 ची भाकीत दिले होते. ह्या वेबसिरीज दुसरा भागाची शूटिंग सुरु आहे असे बऱ्याच वेळा मेकर्स कडून व ह्या वेबसिरीज च्या कास्ट कडून माहिती मिळाली आहे. ह्या वेबसिरीज पुढचा भाग 2025 च्या शेवटी रिलीज होणार आहे असे मेकर्सकडून माहिती पडले आहे.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.