मॅडोक फिल्म ची होर्रर कॉमेडी फ्रॅन्चायजी त्याचा अजून एक सिनेमा घेऊन येत आहे. Stree 2 ह्या सिनेम्याचं शूटिंग पूर्ण झाले असून मेकर्स सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहे. सिनेम्याचा टिझर मेकर्स नि फक्त सिनेम्यागृहात रिलीज केला असून, अजून हा टिझर युट्युब वर आला नाही. स्त्री हा हॉरर कॉमेडी सिनेमा 2018 साली आला होता, तब्बल सहा वर्षाने ह्या सिनेम्याचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्त्री ह्या सिनेम्यामध्ये बॉलिवूड सुपरस्टार एक्टरेस Shraddha kapur हि स्त्री च्या भूमिकेत होती. त्यासोबत ह्या सिनेम्यात Rajkumar rao, Aparshakti khurana, Pankaj tripathi, abhishek banarji हि स्टार कास्ट होती. स्त्री 2 ह्या सिनेम्यात हि हीच स्टार कास्ट असून ह्यामध्ये अजून एक नाव आहे मात्र मेकर्सनी ह्याबद्दल गुपित ठेवलं आहे. सध्याच्या काळात होर्रर सिनेमे फार कमी येत आहे. काही वर्षपूर्वी प्रत्येक वर्षी एक हॉरर सिनेमा मेकर्स बनवत असत मात्र बदलत्या काळानुसार प्रेक्षक हि बदलला असून vfx ने भरलेल्या ऍक्शन सिनेमे सध्या प्रेक्षक बघणे पसंद करत आहे, त्यामुळे हॉरर सिनेमे फारसे बनत नव्हते. मात्र 2018 साली आलेल्या स्त्री हा होर्रर सिनेमा हिट झाला . बऱ्याच वर्षानंतर हॉरर सिनेम्याला लोकांनी पसंती दर्शवली होती सिनेमा हिट झाला होता. सिनेम्याचं बजेट 25 कोटी एवढं होत मात्र सिनेम्याने तब्बल 180 कोटी एवढी कमाई केली व सिनेमे सुपरहिट ठरला होता. त्यामुळे मॅडोक त्याचे पुढचे हॉरर सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले. स्त्री नंतर रुही, भेडिया हे सिनेमे आले मात्र हे दोन्ही सिनेमे एवरेज ने चालले. मात्र मॅडोक चा नुकताच आलेला मुंजा ह्या कमी बजेट असलेल्या व कोणतीही मोठी स्टार कास्ट नसलेल्या सिनेमा मात्र चांगलं कलेक्शन करत आहे.सिनेम्याचं कलेक्शन 50 कोटी च्या पार गेलं असून सिनेमा अजूनही सिनेम्यागृहात सुरु आहे.
Stree 2 ह्या सिनेम्यात श्रद्धा कपूर, राजकुमार राव व अपारशक्ती खुराणा व पंकज त्रिपाठी हीच स्टार राहणार आहे. मात्र सिनेम्यात vfx चा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे. सिनेमा आधीच्या स्त्री पेक्ष्या जास्त हॉरर व कॉमेडी बनवला असून सिनेम्याला जास्त इंटरटेनिंग बनवलं आहे. सिनेम्याचं दिग्दर्शन अमर कौशिक ने केलं आहे. स्त्री ह्या पहिल्या भागाचहि दिग्दर्शन अमर कौशिक ने होत. अमर कौशिक ने या आधी बाला, भेडिया हे सिनेमे दिग्दर्शित केले आहे. Stree 2 हा सिनेमा 15 ऑगस्ट ला रिलीज होणार आहे.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती जाऊन घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.